Monday, March 27, 2023
Home नांदेड सदैव जनतेच्या सेवेत राहणारे आ.कल्याणकर लोकप्रियच-आनंद जाधव -NNL

सदैव जनतेच्या सेवेत राहणारे आ.कल्याणकर लोकप्रियच-आनंद जाधव -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड। नांदेड उत्तरचे आ.बालाजीराव कल्याणकर हे सतत जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते रात्री असो की दिवस धडपड करत शेवटच्या स्थरातील नागरिकांपर्यंत आपण कसे पोहचू शकतो आणि त्यांच्या अडचणी तात्काळ कशा सोडविता येतील यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि नागरिकांचे ताटकळलेली कामे जलदगतीने सोडवितात त्यामुळेच नांदेड उत्तर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार म्हणून आ.कल्याणकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते, असे प्रतिपादन नांदेड हिंगोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते आनंदराव जाधव यांनी केले.

नांदेड तालुक्यातील सुगाव खु. येथे  हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड उत्तरचे तालुकाप्रमुख संतोष भारसावडे यांच्यावतीने आयोजित कार्यकर्त्यांचा सत्कार आणि स्नेह भोजन कार्यक्रमात ते बोलत होते.

सुगाव खु.येथे तालुकाप्रमुख संतोष भारसावडे यांच्या मळ्यात  हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांचा सत्कार आणि स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे उपनेते आनंद जाधव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आज आ. बालाजी कल्याणकर बिनकामाचे मतदारसंघात उठ-सुठ कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. अशी ओरड विरोधकांकडून केली जात आहे.

परंतु या विरोधकांना दुसरा कुठलाही मुदा नाही. विकास कामावर अवाक्षरही काढत नाहीत. उलटपक्षी आ.कल्याणकर हे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळेच नांदेड उत्तर मतदारसंघात त्यांची लोकप्रियता वाढली आहे. हे त्यांच्या कामावरुन दिसून येते. त्यामुळे आगामी काळातील कोणत्याही निवडणुकांत आ.कल्याणकरांचीच विजयी पताका राहणार असल्याने विरोधक अशी शब्दांची उठाठेव करुन टिंगल टवाळी करीत आहेत. त्यांच्या या टिंगल टवाळीला जनताच रोखठोक उत्तर देईल हे येणार्‍या काळात दिसून येईलच. ते पाहण्यासही विरोधकांनी धाडस ठेवावे, असा सल्लाही जाधव यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.

या कार्यक्रमाला आ.बालाजी कल्याणकर, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख रत्नमालाताई मुंडे, संपर्कप्रमुख गंगाधर बडुरे, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, आनंद बोंढारकर, उपजिल्हाप्रमुख सचिन किसवे, महिला जिल्हाप्रमुख गितांजली पवार, महिला आघाडीच्या जिल्हा शहरप्रमुख शक्ती ठाकूर, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम, पंचायत समितीचे माजी सभापती देविदास सरोदे, जिल्हा प्रवक्ते माधव महाराज हिंगमिरे, तालुका संघटक नवनाथ काकडे, सुगाव खु. उपसरपंच अनिल पा.शिंदे, सहसंपर्कप्रमुख दर्शनसिंग सिध्दु, विधानसभा समन्वयक विजय कदम, उपतालुकाप्रमुख गणेश बोकारे सोमेश्र्वरकर, धनंजय पावडे, बालाजी पावडे, गजानन वाघ, बाबा जानकर, विकास देशमुख, प्रल्हाद जोगदंड, वैजनाथ सूर्यवंशी, व्हनाजी जामगे, घनश्याम सूर्यवंशी, बालाजी पोफळे, शंकरराव भोसले, हनुमान चंदेल, गब्बू बोकारे, संतोष मादनवाड, मनोज ठाकूर, कुवरचंद यादव, मुन्ना राठोड, चंद्रकांत पावडे, संजय शेळके, लक्ष्मण कल्याणकर, दिपक भोसले, राजू वाघमारे, बळीराम सरोदे, रंगनाथ सरोदे, हरी भोसले, पत्रकार आनंदा बोकारे यांच्यासह उत्तर मतदारसंघातील शिवसैनिकांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!