
हिमायतनगर। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि 25 जानेवारी रोजी जि.प. प्रा. शाळा वडगाव ज. येथे शालेय परसबाग व रोपवाटीकेचे थाटात उदघाटन करण्यात आले.


यावेळी हिमायतनगर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री मयूरकुमार आंदेलवाड, हिमायतनगर पंचायत समितीचे नूतन गटशिक्षणाधिकारी शिवाचार्य साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, शा.व्य. समितीचे अध्यक्ष बालाजी लिंगमपल्ले, सदस्य तुकाराम शिंदे, महेश ताडकुले, अशोक वाकोडे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते परसबागेचे व रोपवाटीकेचे उदघाटन झाले.


यामध्ये टोमॅटो,वांगी,मिरची, कोथिंबीर, मेथी यासारख्या पालेभाज्या व फळभाज्या लागवड करण्यात आली त्याची पाहणी मान्यवरांनी केली व समाधान व्यक्त केले.नंतर सर्वांनी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली त्या ठिकाणी भेट करून कौतुक केले.शाळेत सुरू असलेल्या एकंदरीत उपक्रमांची माहिती श्री गायकवाड सर यांनी करून दिली.सर्व मान्यवरानी शाळेत सुरू असलेल्या गुणवत्तापूर्ण उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.मा गटविकास अधिकारी श्री आंदेलवाड साहेब यांनी सर्व शाळेची पाहणी करून कौतुक केले व काही सूचना केल्या.


नूतन गटशिक्षणाधिकारी श्री शिवाचार्य यांची शाळेला पहिलीच भेट झाली. साहेबानी पण शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अरुण पाटील यांनी सुद्धा सर्व शिक्षकांचे कौतुक केले व प्रेरणा दिली. सूत्र संचालन श्री स्वामी सर यांनी केले तर प्रास्ताविक श्री गायकवाड सर यांनी केले व वंजारी सर यानी आभार व्यक्त केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोपनर सर, वंजारी सर, राठोड सर यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी झाला.
