
लोहा| लोह्याच्या वैद्यकीय क्षेत्रांत आधुनिक उपचार यंत्रणा कार्यान्वित होते आहे तालुका पातळीवर हृदय रोग एम डी डॉक्टर सह सर्जन अस्थिरोग तज्ज्ञ यामुळे रुग्ण व रुग्ण नातेवाईक याना मोठा आधार मिळत असतानाच आता त्यात आणखी एका अत्यावश्यक तपासणी यंत्रांची भर पडली आहे.डॉ महेश दशरथ राव सूर्यवंशी या भूमीपत्रांनी लोह्यात सिटी स्कॅन यंत्र आणले असून त्याचे आज बुधवारी शुभारंभ होणार आहे.

तालुक्याच्या ठिकाणी सिटी स्कॅन मशीन म्हणजे रुग्ण व नातेवाईक यांची आरोग्य विषयक मोठी सोय मानली जाते लोह्यात हृदय रोग तज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, अस्थीरोग , भूल तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ञ असा निष्णात डॉक्टरांची व्यवस्था आहे शिवाय डॉ महेश किलजे यांनी चार वर्षा पूर्वी सोनोग्राफी सेंटर टाकले व रुग्णाची नांदेडला जाणारी चक्कर टाळली.त्यात भर पडली ती डॉ किलजे यांचे कलर डाफलरची पण आणखी एक सुविधा डॉ सूर्यवंशी यांनी उपलब्ध करून दिली आहे.

ती म्हणजे सिटी स्कॅनची त्यामुळे वैदयकीय उपचार क्षेत्रांत लोहा आता पुढे आला आहे डिजिटल एक्सरे फोर डी सोनोग्राफी, सी टी स्कॅन या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला म्हणजे २५जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन झाले. माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी , नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, दशरथराव सूर्यवंशी, गंगाधर सूर्यवंशी, डॉ महेश सूर्यवंशी व परिवाराने रुग्ण व नातेवाईक यांच्यासाठी ही सोय उपलब्ध करून दिली.

अर्धांगवायू व अन्य हृदय मेंदू शी निगडित सी टी स्कॅन काढण्याची सोय लोह्याच्या सारख्या खेड्याचा तोंडवळा असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी झाली त्याचा खूप फायदा रुग्णाला होणार आहे डॉ महेश सुर्यवंशी यांनी मोठी गुंतवणूक केली ती केवळ आणि केवळ रुग्णसेवा समोर ठेवून त्यामुळे डॉ सूर्यवंशी यांच्या कार्याची रुग्ण व नातेवाइक याना मोठा आधार मिळाला आहे.

