
नांदेड/हिंगोली| प्रजासत्ताक दिनी जगत्ज्योती पब्लिक स्कूल, कुरुंदा येथे आनंदनगरी व क्रीडा महोत्सव बक्षीस वितरण सोहळा संपन्न. आज दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सौ. उषाताई शिवाजीराव इंगोले पाटील (अध्यक्ष- निर्भय नारी फाउंडेशन, पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद नगरी व क्रीडा महोत्सवातील बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला,यावेळी पुणे येथे वास्तव्यास असलेल्या तथा यशस्वी उद्योजिका उषा पाटील इंगोले यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.

तसेच सौ.सुवणार्ताई गणेशराव इंगोले पाटील (सरपंच प्रतिनिधी कुरुंदा.), सौ.रेखाताई दतरामजी इंगोले पाटील, (माजी सरपंच , कुरुंदा.) पालक प्रतिनिधी श्री मंगेशराव बागल, श्री प्रदीप महाराज मठपती (संचालक -ज.ज्योती .पब्लिक स्कू. कुरुंदा.) श्री मनोज नरडेले (कार्यकारी संचालक ज.ज्योती प.स्कूल कुरुंदा) सौ .सीमा सोळंके (पोलीस सहाय्यक, कुरुंदा) श्री मदनराव शिंदे (प्राचार्य ज. ज्योती औद्यो. प्रशिक्षण संस्था कुरुंदा)श्री राजेश नरवाडे (मुख्याध्यापक) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी भाषणात हर्षवर्धन दळवी, हर्षद अंभोरे , जान्हवी राठोड, राजश्री दळवी , धनश्री देशमुख जिजेश इंगोले, देविका माने, बसवराज तम्मेवार, आरक्ष नरवाडे, शिवराज देशमुख, ओंकार माने, अन्वी देशमुख, केदारनाथ बागल. इत्यादी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

नंतर प्रमुख मार्गदर्शिका सौ उषाताई इंगोले यांनी विद्यार्थी आहार, शिस्त, शिक्षण यातून घडणारे व्यक्तिमत्व व देशाचे आव्हान या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आनंदनगरी तून यावेळी देवेश संतोष कांचनगिरे, (प्रथम) सुदर्शन ज्ञानेश्वर बागल, (द्वितीय )प्रथमेश बागल, (तृत्तीय )प्रियांश प्रशांत जटाळे, (उत्तेजनार्थ) मितांश मनोज नरडेले, (उत्तेजनार्थ) अशी अनुक्रमे बक्षिसे देण्यात आली. वेषभूषासाठीजीजेश विष्णू इंगोले,स्वराज गंभीर डाढाळे, आराध्या सिद्राम गवळी, तर गणितीय कोडे कोण बनेगा स्कॉलर गणितीय परिमाणे या शैक्षणिक साहित्याला मान्यवराच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली व तसेच क्रीडा महोत्सवातील बक्षिसे यांचेही वितरण यावेळी करण्यात आले़

