
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलित जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नायगावच्या वतीने जिल्हा पातळीवरील कै अमृतराव पाटील चव्हाण वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे हे सलग 34 वे वर्षे होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 23 शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य केशवराव सूर्यवंशी यांनी आपल्या शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन वर्षभराचा लेखाजोखा त्यांनी उपस्थित समोर मांडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता हायस्कूल नायगावचे उपमुख्याध्यापक सा. रा. जाधव हे होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रभाकर पवार प्रा. डॉ. गणेश देवडे, प्रा. सौ. शोभा शिंदे, यशवंत चव्हाण, पर्यवेक्षक सरगुले एम. एस,प्रा. नागनाथ पाटील, एल. आर. पाटील, प्रा. माधव भाऊ बावलगावे, प्रा. गजानन शिपाळे, प्रा. राजेश शिंदे, प्रा. नागप्पा दुड्डे, प्रा. अनिल सूर्यवंशी, प्रा. शिवाजी पावडे, प्रा. मधुसूदन इंगळे याची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेचे बक्षीस वितरण एज्युकेशन सोसायटी नायगावचे सचिव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य केशवराव सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.हेमंत बावणे, प्रा. रामदास बोकारे, केंद्रप्रमुख उद्धव ढगे यांनी काम पाहिले. सदरील स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. शिवानी साहेब ढगे, जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नायगाव या विद्यार्थिनींने पटकावला.

शिवानीला रोख 2100 रु. व स्मृतिचिन्ह मिळाले स्पर्धेत दुसरा क्रमांक कु. शबाना नजीर शेख, साईबाबा क. म.वी. शंकर नगर या विद्यार्थिनी पारितोषिक मिळाले. तिला रोख 1500 रु. व स्मृतीचिन्ह तर तिसरा क्रमांक कु. जानवी भुजंग पांचाळ जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर हिला रोख 1100 रु. व स्मृतिचिन्ह तसेच प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून कु. तरन्नूम शेख, जय किसान माध्यमिक विद्यालय कोल्हेबोरगाव या विद्यार्थ्यांनीस 700 रु. रोख व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदरील वकृत्व स्पर्धेचे आयोजक प्रा. डॉ.राजेंद्र इंगळे, वसंत माने हे होते त्यांना श्री सय्यद वसीम, प्रा. तिरुपती मेथे, शरद जोनकल्ले, प्रा भालेराव शेख बी. हनमंते सर आर.,आनंद गायकवाड, गोवर्धन जाधव शिवराम चव्हाण, शेख हसन, श्रीराम चव्हाण यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम पाटील यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. पि. डी. जाधव बारूळकर यांनी मांडले.

