उस्माननगर,माणिक भिसे। २७ जानेवारी रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील सिडको ( नवीन नांदेड) रमाई आंबेडकर चौक येथून मोटरसायकल वरून निघालेल्या भव्य बुध्द मूर्तींचे जागोजागी बुध्द अनुयायी यांनी फुलांची वृष्टी करून मंगलमय वातावरणात जंगी स्वागत केले.
उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथे भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी दिवसभर सिडको ,गुंडेगाव, बाभुळगाव ,वाघाळा ,किवळा, लोंढे सांगवी , उस्माननगर सह शिराढोण नगरीत गावातील प्रमुख मार्गाने भव्य मोटारसायकल रॅली काढून मूर्तीचे रांगोळी , पुष्पवृष्टी करून व जयघोषात स्वागत करण्यात आले.
आज २८ जानेवारी रोजी पंचशील बुध्द विहार येथे सकाळी संबोधी ग्रंथालयाचे उद्धघाटन तथा मार्गदर्शक आदरणीय डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर ,( राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तथा अध्यक्ष समता सैनिक दल) यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मा.एस.के.भंडारे ( राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा प्रभारी म. रा. व स्टाॅप ऑ. स.सै. दल मुंबई ) मा.बी.एम.कांबळे ( रा. सचिव तथा प्रभारी तेलंगणा राज्य) यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यानंतर भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प.पु.भदन्त बी.संघपालजी महाथेरो ( राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा बौद्ध महासभा तथा राष्ट्रीय अध्यक्ष भिकू संघ) यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
यावेळी मंगलमय सोहळ्यास मान्यवर मंडळी ,व गावातील प्रतिष्ठित नागरिक व बौद्ध उपासक उपासिका भिमसैनिक उपस्थित राहणार आहेत. तरी पंचक्रोशीतील भीमसैनिकांनी व उपासक ,उपासिका यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण जमदाडे , भगवान राक्षसे ,मनोज जमदाडे ( भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा शिराढोण कंधार ) यांनी केले आहे.