
नांदेड। येथील शिवाजीनगर स्थित भगवती मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे डॉ योगेंद्र प्रकाश चिद्रावार, एमसीएच युरो सर्जन हे भगवती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सामील होत आहेत, मेडिकल सुपरस्पेशालिटीं सोबतच आता टीम भगवतीमध्ये आणखी एक सर्जिकल सुपरस्पेशालिटी जोडली गेली आहे अशी माहिती संचालक डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी याप्रसंगी दिली..

युरो सर्जरी तज्ञ म्हणून डॉक्टर योगेश हे नुकतेच कार्यरत झाले असून त्यांच्या नियुक्ती बद्दल भगवती मल्टीस्पेशलिटीच्या टीमच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक डॉक्टर अंकुश देवसरकर , डॉ शुभांगी देवसरकर ,डॉक्टर राहुल देशमुख, डॉक्टर व्यंकटेश दुबे ,हृदयरोग तज्ञ डॉक्टर विपिन भांगडिया, डॉक्टर श्रीनिवास संगनोर, डॉक्टर संदीप चाबुस्कवार पाटील, डॉ निशिकांत एकलारे,डॉ विद्या एकलारे यांच्यासह टीमची उपस्थिती होती ,

डॉक्टर योगेश हे भगवती मल्टी स्पेशलिटीयेथे युरो सर्जन म्हणून मूत्रपिंडविकार, मूत्रसंस्था – शरीरशास्त्र, तीव्र मूत्रपिंडदाह, मूतखडे, लेप्टोस्पायरॉसिस, मूत्रमार्गाचा जंतुदोष अशा प्रकार्या मूत्रसंस्थेच्या निगडीत व्याधीग्रस्त रुग्णांना सेवा देतील अशी माहिती डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी दिली.

