
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। प्रजासत्ताक दिनाचा ग्रामपंचायत ताकबीड येथील ध्वजारोहण विद्यमान नवनिर्वाचित सरपंच सौ.कल्पना रणजित कुरे यांनी निर्वाचित झाल्या नंतर प्रथमच ध्वजारोहण असताना देखील मनाचा मोठेपणा दाखवत देशाच्या रक्षणासाठी समर्पित भावनेने कुटूंबियांन पासून हजारो किलोमीटर दूर राहून जीवाची परवा न करता देशाचे संरक्षण करणाऱ्या भारतीय सैन्य दलातील जवान श्री. सुजितकुमार श्यामराव भत्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सरपंच महोदयांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे.ध्वजारोहण सैनिकांच्या हस्ते केल्याने जनमानसात व ग्रामस्थांन मध्ये भारतीय सैन्यात कार्यरत असणाऱ्या सैनिकांन बद्दल आदर व सन्मान यामाध्यमातून वृद्धिंगत झाला.वास्तविक पहाता ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण मुख्यतः सरपंच याच्या वतीने करण्यात येत असतो.

पण आज देखील समाजात अनेक घटक आहेत जे की स्वतःचे अस्तित्व बाजूला ठेवून देश सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेले असते यापैकीच एक म्हणजे भारतीय सैन्य दलातील कर्मचारी यांना ताकबीड ग्रामपंचायतीने ध्वजारोहणाचा बहुमान दिला.विशेषतः निवडून आल्या नंतर पहिलाच हा ध्वजारोहण होता.यामाध्यमातुन ताकबीड ग्रामस्थांच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.त्यानंतर लागलीच ग्रामसभा देखील संपन्न झाली.

यावेळी उपसरपंच भागबाई कुरे, ग्रामपंचायत सदस्य अनुसयाबाई कुरे, महानंदा कुरे,देविदास इंगळे, विठाबाई मंडलापुरे,गीताबाई शिरधे, मारोती मंगनाळे मा.सरपंच मदन कुरे,पंढरी इंगळे, लिंगेश्वर मंडलापुरे,दिंगबर कुरे, शंकरराव मंडलापुरे,तंटामुक्ती अध्यक्ष शिवसांब कुरे,पो.पा. गणेश शिरधे, शिवहार कुरे,अंगणवाडी कर्मचारी अंजनबाई कुरे,गिरीजाबाई झगडे,सुमनबाई वरवटे, आशा वंदना शिरधे,शिवाजी टेकाळे, माधव वरवटे, तुकाराम इंगळे, विश्वाभर गोरे,बालाजी मंडलापुरे,रवी कुरे,राजू झगडे, कपिल कुरे, बबन कुरे आदीसह ग्रामस्थ उपस्थिती होती.

