
नविन नांदेड। भव्य रक्तदान शिबिर हे स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून सिडको हडको परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हडको येथे आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजक संजय पाटील घोगरे, भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार चिखलीकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संजय पाटील घोगरे यांनी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी सह अनेक रूग्णाची सेवा केली असल्याचे सांगून परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी ही अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक संजय पाटील घोगरे तर सुत्रसंचलन धिरज स्वामी तर आभार प्रदर्शन राजु पाटील घोगरे यांनी केले.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड ,भाजपा प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख,दिलीप कंदकुर्ते, माजी मनपा विरोधी पक्षनेते दिपकसिंग रावत ,माधव देवसरकर,अनिल पाटील बोरगांवकर,बळी पाटील जानापुरीकर,यांच्या सह जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई पाटील देवरे,भाजपा नगरसेविका सौ.इंदुबाई घोगरे, सौ. बेबीताई गुपीले, पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, बालाजी पाटील पुणेगांवकर,माजी नगरसेवक राजू गोरे, संदीप पाटील चिखलीकर, किशोर देशमुख,विजय गंभीरे, नरेंद्र गायकवाड,साईनाथ ट्रके,सिडको मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, संतोष वर्मा,जनार्दन ठाकूर, गजानन कते, अशोक पाटील लोंढे, राजेश महागावे,

भुंजगराव पाटील गुंडेगावकर, मिलिंद देशमुख, डॉ.ढगे, यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती ,या रक्तदान शिबीर मध्ये कै.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रक्तपेढी विष्णुपुरी,जिवन आधार, इंडियन रेडक्रास , अर्पण रक्तपेढी ने या शिबिरात रक्त संकलन केले.जास्ती जास्त रक्तदान करून शिबीर यशस्वी करण्यासाठी आयोजक संजय पाटील घोगरे ,अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष तथा संस्थापक युवा शक्ती मित्र मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले .या शिबिरात शहरी व ग्रामीण भागातील ५०६ रक्तदात्तायांनी रक्तदान केले.

