
नायगांव, रामप्रसाद चन्नावार| एज्युकेशन सोसायटी नायगाव बाजार संचलित जनता प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवीत घवघवीत यश संपादन केले. सायन्स ओलंपियाड नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय जनरल नॉलेज ओलंपियाड या परीक्षांमध्ये विशेष सुवर्णपदकासह यश प्राप्त केले.

यात इयत्ता दुसरी वर्गातील हिवराळे विराज साईनाथ कास्यपदक,उडते वार रूद्रा कास्यपदक,महागावे अनुष्का निळकट सुवर्णपदक, भद्रे कोंडीबा, कुंभार मदन मंचक, पांचाळ शिवराज, सोनाक्षी नाईक, बागे वैभवी, शेख नुदरत, शेख अख्तर रजा फारुख तर इयत्ता सातवी मधील कुमारी वजीरगावकर आदिती, कांबळजकर प्रणिता, हंबर्डे श्रुती, नरसीकर संजीवनी, उलेवाड दुर्गा, वाघमारे संकेत, शिंदे रविराज, शिंदे सुमित, शेख तवकीर, शेख सुफियान, शेख इब्राहिम, शेख साबिर, भालेराव आदित्य, हळदेकर नारायण, गजभारे ओंकार, टेकाळे जयराज संतोष, मध्यमवार ऋषिकेश, टेकाळे साईनाथ, कुरुंदे दैवशाला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यमान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार श्री. वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित संस्थेचे सचिव प्राध्यापक श्री. रविंद्र पाटील चव्हाण साहेब माजी शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे प्राचार्य केजी सूर्यवंशी सर माजी प्राचार्य मेथे सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण सर व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले.

