
हिंगोली/नांदेड। जिल्ह्यातील एक प्रगती शेतकरी व ऊस संशोधनांमध्ये केलेली कामगिरी अतिशय मोलाची असून ऊस उत्पादना बाबतीमध्ये नेहमी अग्रेसर राहून इतरांनाही उसाचे उत्पन्न घेण्यासाठी मदत करून त्यांना ऊसाविषयी माहिती माहिती देऊन व टोकाई सहकार कारखान्यांना उत्तमरीत्या चालू शेतकऱ्यांना कामगारांना तोडणी वाहतूक ठेकेदारांना सभासदारांना न्याय मिळवून दिल्याबद्दल व आपण केलेल्या कार्याची दखल घेऊन नुकतीच महाराष्ट्र राज्य व उत्पादन संघाचे अध्यक्ष अतुल नाना माने पाटील यांनी समर्थक यांची हिंगोली जिल्हाध्यक्षपदी नुकतीच पत्र देऊन नियुक्ती केली आहे.

सवंडकर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना विविध जातीच्या व संशोधन व ऊस पिकाविषयी माहिती देऊन त्यांनी कारखान्यांना योग्य प्रकारे ऊस पुरवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली त्यांचे कार्य शेतकऱ्यांच्या हिताचे असून नेहमी ते त्यांच्यासाठी झटत असतात. याच कार्याची दखल घेऊन त्यांना हिंगोली जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली. शेती विषयी विविध प्रकारचे त्यांनी स्वतः करत असतात व शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करतात त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादन संघ यांच्या वतीने हिंगोली अध्यक्ष याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे.

नुकतीच एका कार्यक्रमामध्ये ऊस उत्पादन संघाचे अध्यक्ष माने पाटील यांना दिनांक 21 जानेवारी रोजी एका कार्यक्रमांमध्ये त्यांची नुकतीच नियुक्तीपत्र देऊन त्यांना बहाल केले आहे. या विषयाबद्दल त्यांचे सहकारी किरण चव्हाण टोकाई सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशवराव मालेगावकर ऋषी कुमार वारे बाबासाहेब शिंदे शेतकरी अध्यक्ष लाभसेटवार साहेब केमिस्ट सुनील पांडे साहेब रमेश इंगोले प्रशासक अधिकारी राजेवार सुरक्षा अधिकारी कंटाळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

