
नविन नांदेड। नविन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने सिडको हडको परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभातफेरी स्पर्धा मध्ये परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवित अनेक ऊपकम सह महापुरुषांच्या वेगवेगळ्या भुमिका साकारात, महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व विविध ऊपकम राबबुन सिडको हडको वाशियाचे मने जिंकली हि प्रभात फेरी पाहण्यासाठी दुतर्फा महिला युवक नागरीक यांनी मोठी गर्दी केली होती.

परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी प्रभातफेरी स्पर्धा आयोजित केली होती यात शिवाजी हायस्कूल, कुसुमताई चव्हाण,इंदिरा गांधी, कस्तुरबा गांधी,विधानिकेतन , महात्मा गांधी, महात्मा गांधी अश्राम शाळा वाघाळा यासह अनेक महाविद्यालये व प्राथमिक गटात नरसिंह विद्यामंदिर,प्रियरदरशनी , छत्रपती शिवाजी, कुसुमताई, महात्मा प्राथमिक, इंदिरा गांधी, यांनी सहभागी होत उत्कृष्ट देखावा, विविध ऊपकम असलेल्या देखावे,यासह शैक्षणिक, सामाजिक व ऐतिहासिक देखावा व महाराष्ट्र राज्याची असलेली सांस्कृती, वारकरी असलेल्या भुमिका, वैज्ञानिक,विर जवान ,लेक्षीम,डंबेलस आदी खेळाचे सादरीकरण सिडको हडको तील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर केले.

यावेळी दुतर्फा रस्त्यावर गर्दी केली.तर इंग्रजी शाळेतली मुलांनी सहभाग नोंदविला, यावेळी भारत माता कि जय, वंदेमातरम्, यासह अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला, तर लेझिम पथकाचे सादरीकरण, डंबेलस व विविध कवायती प्रकार सादरीकरण करण्यात आले.

स्पर्धा परीक्षांना साठी पाच परिक्षक नेमण्यात आले होते, निकाल आल्या नंतर प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह, पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन एका कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहेत. हि स्पर्धा यशस्वीतेसाठी अध्यक्ष किरण देशमुख, उपाध्यक्ष शाम जाधव, सचिव रमेश ठाकूर, कार्याध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे, कोषाध्यक्ष निळकंठ वरळे, सल्लागार तुकाराम सावंत,अनिल धमणे यांनी परिश्रम घेतले.

