
लोहा| औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे.शाळानिहाय शिक्षक मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू आहेत.या मतदारसंघात तिरंगी लढत होते आहे .दोन माजी आमदार भाई कुरुडे व रोहिदास चव्हाण यांच्या प्रचार भेटी सुरू आहेत .हे दोन्ही नेते एकाच शाळेत योगायोगाने आले आणि त्यांनी एकमेकांच्या समोर आपला उमेदवार कसा प्रभावी आहे हे शिक्षक मतदाराना सांगितले. सुज्ञास सांगणे न लागे . म्हणत या दोन्ही आमदारांनी नंबर एकच मते देण्याचे आवाहन केले आणि पुढच्या प्रचार गाठीभेटीसाठी रवाना झाले.

त्याचे असे झाले की, औरंगाबाद शिक्षक मतदार संघाची निवडणूक यंदा चुरशीची होते आहे नाराजी व परिवर्तन असा सूर उमटला आहे.लोहा कंधार तालुक्यातील माजी आमदार -जिल्ह्याचे खासदार हे मतदारांशी थेट संवाद साधून आपल्याच उमेदवारांना नंबर एकच मत द्यावे असे आवाहन करीत आहेत.

बुधवारी सकाळी जुन्या लोहा शहरातील शिवछत्रपती विद्यालयात माजी आमदार रोहिदासराव चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवार आ विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी आले. त्याच्या सोबत विष्णू शिंदे हे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपा वर प्रहार करत आ काळे याना मतदान करा असे आवाहन करत असतानाच श्री शिवाजी मोफत एज्युकेशन संस्थेचे संस्थापक सचिव भाई गुरूनाथराव कुरुडे आले त्यांच्या सोबत शिक्षक नेते बी डी जाधव, गायकवाड होते .

भाई कुरुडे यांनी कंधार चे भूमीपत्र विश्वासराव हे शिक्षक संघाचे उमेदवार आहेत शिक्षकांचा प्रतिनिधी आहे त्यांना निवडून देणे कसे गरजेचे आहे हे परखडपणे व काळाची गरज असल्याचे सांगीतले .त्यावेळी माजी आ रोहिदास चव्हाण हेही तेथेच होते.त्यांनी हे ऐकले त्याच वेळी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष बी डी जाधव यांनी या दोन्ही नेत्यांच्या समोर शिक्षकांच्या प्रश्नचा उहापोह केला आणि विद्यमान आमदार काळे यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली.या दोन्ही नेत्यांचे मुद्दे आणि त्यातच शिक्षक नेत्यांची भूमिका असा थेट आरोपप्रत्यारोपांचा सामना उपस्थित शिक्षक मतदारांना पाहता व ऐकता आला.तसा हा योगायोग .

आपण जुळवुन आणतो म्हटलं तरी येत नाही पण एकेकाळी कट्टर विरोधक असलेले भाई कुरुडे व माजी आ रोहिदास चव्हाण यांनी आमनेसामने प्रचारात भेट झाली पण यात कटुता नव्हती तर आपलेपणा होता.शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक दामोधर वडजे व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हणमंत पवार यांनी या दोन्ही माजी आमदार यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला.आभार आर आर पिठ्ठलवाड यांनी मानले .विरोधी उमेदवाराच्या स्टार प्रचारकांचे विचार एकाच वेळी परस्पर विरोधी सूर ऐकण्याचा दुर्मिळ योग शिक्षकांना आला .

