
उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर ता.कंधार येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दि.२ ( दोन ) फेब्रुवारी २०२३ ला होणार आहे.या निवडणुकीत तीन पॅनल आमने-सामने उभे राहून दंड ठोकून उभे राहिल्याने तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत एक प्रकारची चुरस निर्माण झाली आहे.

सविस्तर माहिती अशी सर्व जिल्ह्यासह तालुक्याचे लक्ष वेधून घेणारी आणि अनेक उमेदवारांचे भवितव्य, अस्तित्व नाकारणारी उस्माननगर सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीत भाजपप्रणीत नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा. मा. प्रतापराव पाटील चिखलीकर पुरस्कृत विद्यमान चेअरमन तुकाराम वारकड गुरुजी यांचे शेतकरी विकास पॅनल व महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनल आणि लोकनेते कै.माधवराव पांडागळे राष्ट्रीय काॅग्रेस पुरस्कृत शेतकरी बचाव विकास पॅनल आणि असे प्रथमच आमने-सामने या निवडणुकीत उभे राहिले आहेत.

उस्माननगर सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीसाठी एकूण तेरा जागा आहेत.उमेदवारी अर्ज भरताना ४९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते.पण अर्ज उचलून घेण्याच्या तारखेला एकूण २६ जणांनी अर्ज ठेऊन बाकीच्यांनी उचलून घेतले.एकास एक उमेदवार देण्यात आले.या निवडणुकीच्या नवीन यादीमध्ये अनेक जणांचे नाव वगळण्यात आले,तर काही जणांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहेत.सोसायटीच्या निवडणुकीमध्ये उस्माननगर ,तेलंगवाडी ,कांजाळा ,कांजाळातांडा (,वाडी) ,या गावाचा समावेश असून भावी चेअरमन कोणत्या गावाचा होणार यामध्ये मतभिन्नता आढळून येते.

या निवडणूकीमध्ये स्थानिक काँग्रेस गटामध्ये बंडखोरी झाल्याने उमेदवार उभे केले होते. उचलून घेण्याच्या तारखेला राष्ट्रीय काॅग्रेस पक्षाच्या एका गटाने अर्ज उचलून घेऊन केवळ दोनच उमेदवार उभे ठेवल्याने सोसायटीची निवडणूक रंगतदार अवस्थेत दिसून येत आहे. उस्माननगर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूकीची जशी तारीख जवळ येत आहे.,त्याप्रमाणे निवडणूकीचे वातावरण तापत असून सभासदांना भेटणे , बैठकीचे आयोजन यावर भर असून,या निवडणुकीमध्ये मतदार राजा कुणाला मतदान करून निवडून आणतो , यांवर सर्व अवलंबून आहे.

उस्माननगर येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ही आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीम आहे. या निवडणूकीमुळे स्थानिक राजकारणाची पितळ उघडे पडणार असल्याचे व आगामी निवडणुका चे राजकारण कार्यकर्ते यांचे संपुष्टात येते की काय ? अशी मतदारांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.

