
भोकर,गंगाधर पडवळे। तालुक्यातील खेळाडूंसाठी इंडोअर बॅडमेंटेन स्टेडियम चे काम सुरु झाले असून क्रिडांगणा करिता मी लागेल ती मदत करायला तयार आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

भोकर येथील संदीप गौड कोंडलवार मित्रमंडळाकडूंन आयोजित केलेल्या आमदार चषक टेनिस बाॅल क्रिकेट सामन्याचा समारोप २६जानेवारी रोजी करण्यात आला.या बक्षीस वितरण सोहळ्यास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमास व्यासपीठावर आ.अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, तालुकाध्यक्ष जगदीश पा.भोसीकर,श्रीजया चव्हाण, बाळासाहेब पा.रावणगावकर, गोविंद पा.गौड, शेख युसूफ भाई, बाबुराव अंदबोरीकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

या सामान्यात आमंत्रित संघांतून पहिले ७०००१रूपयाचे बक्षीस मुखेड येथील सोहेल ऐलेवन संघाने मिळविले.दुसरे ५०हजाराचे बक्षीस भोकर येथील बीसीसी संघाने मिळविले , ३१हजाराचे तिसरे बक्षीस देगलूर संघाने मिळविले तर २१हजाराचे चौथे बक्षीस उदगीर संघाने मिळविले.या सामन्यात मॅन ऑफ सिरीज विपिन पवनकर, बेस्ट बॅटसमन रोहन रेड्डी(उदगीर),बेस्ट बाॅलर रिजवान,बेस्ट किपर प्रशांत आडे,बेस्ट फिल्डर आकाश सुंकरवाड याने मिळविले.

यावेळी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहीद झालेल्या कु़टंबियांचा सत्कारही करण्यात आला. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत १६अमंत्रित संघांनी सहभाग घेतला होता.तर या स्पर्धेचे आयोजक संदीप पाटील गौड यांनी यावर्षी खेळाडूंनी व प्रेक्षकांनी भरभरून साथ दिली चांगला खेळ दाखविला पुढच्या वर्षी दिवस रात्री चे व याही पेक्षा जास्त संघ यांचे सामने खेळऊत असे म्हणाले.

