
नांदेड| रेल्वे विभागीय कार्यालय, दक्षिण मध्य रेल्वे , नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी 74 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक , नांदेड यांनी मिनी स्टेडीयम, रेल्वे कार्यालय, नांदेड येथे राष्ट्रीय ध्वज फडकावून 74 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला.

या प्रसंगी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या जवानांनी सुंदर परेड सादर केली. ज्यांची सर्व उपस्थितांनी दाद दिली. श्री उपिंदर सिंघ,, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी या परेड चे निरीक्षण केले. परेड चे निरीक्षण केल्या नंतर श्री उपिंदर सिंघ यांनी आपल्या भाषणात नांदेड रेल्वे विभागाने केलेल्या विविध कार्यांची माहिती दिली. रेल्वे नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी नांदेड विभागास प्रगती पथावर नेत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच रेल्वे प्रवाश्यांची सेवा करत राहण्याचे सर्वांना आवाहन केले.

त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे –
1) जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांना जागतिक दर्जाचे स्थानक बनवणार, याची प्रक्रिया सुरु झाली आहे
2) जालना आणि औरंगाबाद येथे नवीन पिटलाईन होणार
3) नोव्हेंबर महिन्यात अकोला – अकोट ब्रोड्गेज वर नवीन रेल्वे गाडी सुरु करण्यात आली.
4) वाशिम ते हिंगोली (57.6 किमी), कोसाई ते हिमायतनगर (82 किमी) आणि रोटेगांव ते औरंगाबाद (61 किमी) स्थानकां दरम्यान रेल्वे विद्युतीकरण कार्य पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ठिकाणी प्रगती पथावर आहे.
5) नांदेड रेल्वे विभागातील 15 रेल्वे स्थानकांवर 93 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले.
6) एप्रिल ते डिसेंबर, 2022 दरम्यान नांदेड विभागातील 23.924 मिलियन प्रवाशांनी यातायात सुविधांचा लाभ घेतला, ज्यामुळे विभागाला 352.63 करोड़ रुपये महसूल प्राप्त झाला.
7) तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे विविध कार्य इंजिनीरिंग विभागातर्फे पूर्ण करण्यात आले.

श्री नागभूषण राव, मुख्य प्रोजेक्ट मेनेजर, गती शक्ती / नांदेड यांनी महाव्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे यांच्या प्रजासत्ताक दिवसाचा संदेश वाचून दाखविला. या प्रसंगी नांदेड रेल्वे विभागातील विविध रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांनी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. ज्यात विविध देशभक्तीपर गीते आणि नृत्य सामील होते. प्रजासत्ताक दिवसा निमित्त नांदेड रेल्वे विभागात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना श्री उपिंदर सिंघ यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. श्री उपिंदर सिंघ यांनी दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संगठन करत असलेल्या कार्याचा विशेष गौरव केला.

