
औरंगाबाद/नांदेड। संपूर्ण भारतात नीटच्या निकालात महाराष्ट्राचा टक्का वाढवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्राचा मानबिंदू….आयआयबी करियर इन्स्टिट्युट सामाजिक कार्यातही आहे अग्रेसर

महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर घडवणारे आयआयबी करियर इन्स्टिट्युट आपल्या शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक कार्यासाठी सुद्धा तेवढेच ओळखले जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर क्लासेस परिसरात आयआयबीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे असतील अथवा पोलीस प्रशासनासोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलेली पोलीस चौकी असेल, कोल्हापुर येथील पूरग्रस्तांना केलेली आयआयबी ने केलेली मदत, गडचिरोलीच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आयआयबी कडून नीट साठी मोफत शिक्षणाचे धडे त्यासोबतच शैक्षणिक साहित्य आयआयबी कडून देण्यात आले होते.

केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी आयआयबी कडून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. आयआयबी चे संचालक प्रा. नरेश भोसले, व त्यांच्या टीम कडून यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांच्यावतीने वीटभट्टी कामगारांच्या मुलांना यापुढेही शैक्षणिक मदत करत राहू असे सांगण्यात आले.

बदलाव हम लायेंगे ग्रुप (BHL)
श्रीमती उषा नळगिरे सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पारडी मक्ता ता अर्धापूर आणि त्यांचे बंधू श्री. संगमेश्वर नळगिरे यांच्या प्रयत्नाने वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठीची शाळा शाळेबाहेर शाळा – चालवली जाते या विद्यार्थ्यांना आयआयबी कडून गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांचे वीटभट्टी काम करणारे पालकही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अभय परिहार, अधिव्याख्याता,डायट, नांदेड, आयआयबी करियर इन्स्टिट्युट ची टीम संचालक व उपस्थित पाहुण्यांना शाळेचा उद्देश, रुपरेषा, कार्यपद्धती, इत्यादी बाबत ओळख करून देण्यात आली.

