
हिमायतनगर,अनिल मादसवार| नगरपंचायत अंतर्गत माझ्याच काळात इदगाह मैदान बांधकामसाठी सण २०१६-१७ मध्ये निदनी मंजूर होऊन बांधकाम झाले होते. त्या जुन्याच कामाला सण २०१९ मध्ये दाखवून नव्याने बांधकाम केल्याच्या नावाने निधी उचला केल्याचे दिसते आहे. नियमानुसार एकाच कामाला दोन वेळा दाखविता येत नाही. म्हणून एकतर दोन वेळा झालेल्या वेगवेगळे ईदगाह मैदानाचे काम दाखवून द्यावे. नाहीतर ईदगाह मैदान चोरीला गेल्याची फिर्याद तरी देण्यात यावी आणि दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आहे.

ते दि.२६ जानेवारी निमित्ताने हिमायतनगर शहरात आले असतांना कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शहरातील धर्मीक स्थळ असलेल्या ईदगाह मैदानावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जुन्या मंजूर निधीतून झालेले कामाचं येथे दिसून येत होते. तर नवीन बांधकाम कुठे..? झाले असा सवालही त्यांनी येथे उपस्थित असलेल्या नगरपंचायत अधिकारी कर्मचारी यांना केला. यावेळी अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली होती. यावेळी माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी “मकरंद अनासपुरे” यांच्या सिनेमाप्रमाणे हिमायतनगर नगरपंचायतीने नव्याने ४४ लाखाच्या निधीतून सण २०१८/२०१९ मध्ये बांधकाम केलेला ईदगाह मैदान चोरीला गेल्याची फिर्याद देण्यात यावी. आणि शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून निधी उचल केल्याबद्दलची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. यावेळी हिमायतनगर नगरपंचायतीचे अधिकारी महाजन, लिपिक शिंदे यांच्यासह उदय देशपांडे, सरदार खान, इरफान खान, जफर लाला, संदीप तुप्तेवार, आदींसह मोठ्या सांख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते व मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.

दुसऱ्या टर्ममध्ये निधी मंजूर करून निधी उचलण्यात आला – मोहम्मद इम्तियाज
याबाबत मुख्य तक्रारकर्ते ज्यांनी हे ईदगाह मैदान प्रकरण उजेडात आणले ते माहिती अधिकार कार्यकर्ते बाबा खान उर्फ मोहम्मद इम्तियाज यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले कि, नगरपंचायत अंतर्गत सन 2017 काळात नगरोत्थान योजने अंतर्गत गणेशवाडी परिसरातील इदगाह मैदान व ओट्याचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर नगरपंचायतीवर दुसऱ्यां टर्मच्या काळात याचं ठिकाणी विकास कामे करायची म्हणून नगरपंचायतचे काही अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी षड्यंत्र करून पुर्वीच झालेले बांधकाम पुन्हा दलितेत्तर योजना भासवून सन २०१८/२०१९ मध्ये शासन स्तरावर दाखवून नव्याने संबंधित इदगाह मैदानाच्या जागेवर बांधकाम करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र सदर बांधकाम कागदोपत्री दाखवून शासनाकडून एकूण ४३ लक्ष ९१ हजार ६८६ एवढा मोठा निधी मंजूर करून हा निधी पुन्हा उचलून घेण्यात आला असल्याचे निदर्शनास आल्याने मी शासन व जनतेच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या संबंधिताच्या गैरव्यवहार व अपहाराची रितसर तक्रार औरंगबाद आयुक्तालय तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे १९ ऑगस्ट २०२२ रोजी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच हिमायतनगर शहरात झालेल्या या कामांसह इतर कामाच्या बाबतीत गेला अनेक वर्षांपासून मुद्दे उपस्थित केला जात असल्याने आता आगामे नगरपंचायत निवंडूक काळात नगरपंचायत णंतर्गत झालेल्या विविध विकास कामाच्या नावाखालील भ्रष्टाचाराचे पितळे उघडे पडतील यात शंका नाही. त्यामुळे जनतेने देखील उमेदवार निवडून देताना केवळ मतांसाठी पैसे देणाऱ्यांना नाही तर प्रामाणीक जनतेची सेवा करू इच्छादणाऱ्या उमेदवारांना नगरपंचायतीत पाठविणे गरजेचे आहे. तरच शासनाच्या पैशाचा खरा उपयोग जनतेसाठी होईल नाहीतर ईदगाह मैदा, शहराची कोट्यवधींच्या निधीतून करण्यात आलेली रस्ते, नालीचे बांधकाम, स्वच्छतेच्या नावाखाली झालेला वायफळ खर्च, सौर ऊर्जेच्या लाईट बसविण्यात झालेला गोलमाल, शहरात करण्यात आलेल्या विहिरीचे बांधकाम, तसेच पाणी पुरवठ्याच्या नावाखाली नव्याने केलेल्या रस्ते फोडून केले जाणारे नुकसान आणि अनेक रस्ते कागदावर दाखवून झालेला भ्रष्टाचार यासारखी प्रकरणे घडतच राहतील यात शंका नाही.

गेल्या दोन वर्षपासून हिमायतनगर शहरातील नागरिकांना नगरपंचायत निवडणुकीची प्रतीक्षा आहे, तर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांकडून आत्तापासून जनतेला आमिष दाखवित मीच खरा जनसेवक आहे हे दाखविण्यासाठी सार्वजनिक कामात समोर समोर येऊन आपली छबी पडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पाहावयास मिळते आहे. परंत्तू आत्ताची जाणत सुज्ञ झाली आहे. जेंव्हा नगरपंचातीत निवडून गेलेले सदस्य तथा नगरसेवक भ्रष्टाचारात सामील होऊन लाखोंची जमीन, प्लॉट, गाडी, तसेच नको ते धंदे करतात. त्यामुळे सहाजिक यांनी शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून माया जमविली हे सिद्ध होते आहे. जेंव्हा जनतेची कामे नगरपंचायतीत असतात त्यावेळी देखील पैशाशिवाय पण हालत नाही. साधा नमुना नंबर ४३ पाहिजे असल्यास २०० रुपये, फेरफार करण्यासाठी हजारो रुपये, एवढेच नव्हे तर पाणी टंचाई, यासह इतर नागरी समस्या तर पाचवीलाच पुजलेल्या आहेत. यामुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवार पाण्यासारखा पैसे ओतून पुन्हा त्याच्या १०० पट करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. हि बाब ओळखून आगामी निवडणुची जनतेने मतदान करताना गंगाभीर्याने विचार करून मतदान करणे आवश्यक असल्याचे मत भ्रष्टाराच्या पोलखोलीनंतर आता ठिकठिकाणी चर्चिल्या जात असल्याचे ऐकू येते आहे.

