Monday, March 27, 2023
Home क्रीडा आदर्श समाज निर्मिती म्हणजेच पसायदान होय -इंद्रजीत देशमुख यांचे प्रतिपादन -NNL

आदर्श समाज निर्मिती म्हणजेच पसायदान होय -इंद्रजीत देशमुख यांचे प्रतिपादन -NNL

पॅरा ऑलिंपिक विजेती माननीय भाग्यश्री जाधव यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान

by nandednewslive
0 comment

मुखेड, दादाराव आगलावे। पुढच्या पिढीसाठी आपण कोणते आदर्श ठेवणार याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. भावी पिढ्यांसाठी मूल्य आणि संस्काराची ठेव ठेवणे हाच पसायदानाचा गाभा आहे. आदर्श समाज निर्मिती म्हणजेच पसायदान होय असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातकीर्त वक्ते तथा माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी मुखेड जि. नांदेड येथे केले.

कै. सौ. भिमाबाई पांडुरंगराव पुंडे स्मृती मातोश्री भिमाई व्याख्यानमाला व गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा प्रसंगी अकरावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवलिंग बादशहा मठसंस्थानचे मठाधिपती सिद्धदयाल शिवाचार्य महाराज होते तर व्यासपीठावर गणाचार्य मठसंस्थानचे डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, नामदेव महाराज दापकेकर, माजी आ. किशनराव राठोड, मुखेडची भूमिकन्या पॅॅरा ऑलिंपिक विजेत्या भाग्यश्री जाधव, व्याख्यानमाला आयोजक मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे, सौ.माला पुंडे, डॉ. गौरव पुंडे, डॉ. सौ. तेजस्विनी पुंडे, संजय पुंडे आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी मातोश्री भिमाबाई व पांडुरंगराव पुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोत्तावार ऑईल मिल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात भूमिकन्या पॅरा ऑलिंपिक विजेती भाग्यश्री जाधव यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार (सन्मानचिन्ह, मानपञ,राशि अकरा हजार रुपये)हस्ते प्रदान करण्यात आला. इंद्रजीत देशमुख व्याख्यान पुष्प गुंफताना पुढे म्हणाले की, जी स्वतःसाठी मागितली जाते ती भीक.. जी कुटुंबासाठी मागितली जाते ती भीक्षा.. जे समाजासाठी मागितले जाते ते दान .. आणि जे विश्वासाठी मागितले ते पसायदान.. खळ लोकांना नष्ट न करता त्यांच्यातील खळपण घातले जावे.

मीडियाचा होणारा भडिमार तसेच बदलत चाललेली सामाजिक परिस्थिती, हरवत चाललेले संस्कार आणि नीतीमूल्ये ही सामाजिक अध:पतनाची कारणे होत. कोविड सारख्या विळख्यातून माणसाला निसर्गाने थांबायला शिकवलं. माणूस थांबला की निसर्ग बहरतो. कोविड संपल्यानंतर माणूस पुन्हा बेफाम आणि बेलगाम झाला आहे. आई-वडिलांनी आपल्या पाल्यासाठी चिंतन करणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीसाठी आपण काय देतोय, मुक्त संस्काराची पेरणी पुढच्या पिढीसाठी करणे अत्यंत आवश्यक आहे. व्याख्यानमालेत संत नामदेव, संत तुकाराम यांचे अनेक दाखले देताना म्हणाले की, संत हे कल्पवृक्षासारखे असतात व्यक्तीला संतांची संगत जर असेल तर जीवन आपोआपच बहरलं जातं. भाग्यश्री जाधव यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना व्याख्यानमालेचे आयोजक मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे म्हणाले की, या भागात जनतेची वैचारिक भूक मोठी आहे. उपाशी राहून मरणाऱ्यापेक्षा खाऊन खाऊन मरणारे जास्त आहेत. बारा वर्षापासून मान्यवर वक्ते बोलावतो. अनेक लोक देवळात जाऊन दुकानदारासारखे वागतात… चार आठाने टाकून काहीनाकाही मागतात.प्रार्थनेत मी आणि माझी भूमिका ठेवल्यास ती अपवित्र होते.ती पसायदानासारखी असावी. भाग्यश्री जाधव यांचा सन्मान म्हणजे समस्त नारी जात व क्रीडा क्षेत्राचा सन्मान होय. भाग्यश्री जाधव ही रणरागिणी व संघर्ष कन्या असून त्यांचे कार्य आव्हानात्मक आहे. शेतकऱ्याच्या मुलीने ऑलम्पिक पर्यंत घेतलेली झेप कौतुकास्पद असून प्रेरणादायी आहे. भाग्यश्री जाधव यांचा प्रवास दिव्यांगाकडून दिव्यत्वाकडे आहे. विधानभवनात वंदेमातरम गीत गायनाची सुरुवात स्व. भाई केशवराव धोंडगे यांनी केली असा उल्लेख करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

पुरस्काराला उत्तर देताना भाग्यश्री जाधव म्हणाल्या की, मी तुमची बाईलेक आहे. मी हरणार नाही देशासाठी सुवर्णपदक नक्कीच घेऊन येईन. माझे लक्ष्य केवळ भारताला सुवर्णपदक मिळवून देणे आहे. माझा संसार नसला तरी तुमची मुले भविष्यात माझा इतिहास नक्कीच वाचतील. पुंडे साहेबांनी मला गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार दिला हा पुरस्कार मी सर्वोच्च समजते. यापुढे मला कितीही पुरस्कार मिळतील परंतू पांडुरंगराव पुंडे गुरुजींच्या नावाने मला दिला गेलेला माझ्या मातीतला पहिलाच पुरस्कार मी कदापिही विसरणार नाही.

अध्यक्षीय समारोप करताना सिद्धदयाल शिवाचार्य महाराज म्हणाले की, पुंडे साहेब यांनी प्रबोधनाचे मोठे कार्य हाती घेतलेले आहे. भाग्यश्री जाधव हिचा मोठा गौरव केला ही खूप मोठी भूषणावह बाब आहे. इंद्रजित देशमुख यांचा परिचय डॉ.सौ. तेजस्विनी पुंडे यांनी करून देताना म्हणाल्या की,
मायबाप केवळ काशी…
तेणे नवजावे तीर्थाशी…
तुका म्हणे मायबापे…
अवघी देवाचीच रूपे…
इंद्रजीत देशमुख उर्फ काकाजी यांचा सविस्तर परिचय करून दिला. मानपत्राचे लेखन व वाचन साहित्यिक शिवाजी अंबुलगेकर यांनी केले. यावेळी भाग्यश्री जाधव यांच्यावरील व्हिडिओ डॉक्युमेंटरी ‘जिप्सी’ मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष जय जोशी यांनी दाखविली.

कार्यक्रमास मोहीब कादरी, श्री काळे (अहमदपूर), खुशालराव पाटील उमरदरीकर, हणमंतराव मस्‍कले, सुरेश आंबुलगेकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, माधव अण्णा साठे, गंगाधर दापकेकर, जगदीश बियाणी, रमेश मेगदे, अरविंद चिटमलवार, प्राचार्य हरिदास राठोड, अरुण महाजन, सुभाष पाटील दापकेकर, मीलचे मालक अशोक कोत्तावार, फ्लेमिंगो चे डॉ. शिवानंद स्वामी, सौ. पुष्पाताई जाधव, श्रीमती आशाबाई जाधव, सौ. रुक्मीनबाई जाधव, बालाजी जाधव, गणेश जाधव, सरपंच प्रतिनिधी आत्माराम तलवारे, प्रकाश गुजलवार, शशीकांत पाटील जाधव, रमेश जाधव, बालाजी पाटील, होनवडजचे ग्रामस्थ, जिप्सीचे दादाराव आगलावे, जय जोशी, बलभीम शेंडगे, बालाजी तलवारे, वैजनाथ दमकोंडवार, सुरेश उत्तरवार, उत्तम अमृतवार, गोविंद जाधव, सरपंच वसंत गायकवाड, प्राचार्य अनिल कोल्हे, मैनौदीन पिंजारी, गोपीनाथ मोरे, शंतनु कैलासे, एमेकर, निळकंठ मोरे, निळकंठ चव्हाण, सुदर्शन मेहकरे, प्रकाश पवार, लक्ष्मण पत्तेवार, जिवन कवटीकवार, डॉ.एस.एन. कोडगीरे, डॉ. एम.जे. इंगोले, डॉ. विरभद्र हिमगीरे, डॉ. आर.जी.स्वामी, डॉ. पी.बी. सितानगरे, डॉ.व्यंकट सुभेदार, डॉ. श्रीहरी बुडगेमवार, डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. राहूल मुक्कामाला, उमेश पाटील, परमेश्वर वाघमोडे, पांडुरंग श्रीरामे, डॉ. फारुख शेख, डॉ. लतीफ मुजावार, डॉ. प्रकाश पांचाळ, डॉ. श्रीकांत खंडागळे, प्राचार्य सुधाकर पा. इंगोले, बालाजी पाटील इंगोले, डॉ. अविनाश पाळेकर, गोपाळ पत्तेवार, साहित्यिक प्रा. विठ्ठल बरसमवाड, नंदकुमार मडगुलवार, उत्तमअण्णा चौधरी, रामराव मस्कले, उत्तम कुलकर्णी, प्रविण कवटीकवार, लक्ष्मीकांत चौधरी, नारायण कवटीकवार, नारायण बिलोलीकर, सुर्यकांत कपाळे, दिनेश चौधरी, एकनाथ डुमने, डॉ. अजय चौधरी, डॉ. प्रल्हाद नारलावार, विरभद्र स्वामी महाराज, डॉ. शिवसांब वडेर, सुदर्शन मेहकरे, किशनराव इंगोले, विद्याधर साखरे,सौ. कुसूमताई चांडोळकर, प्राचार्य कैलास मुंडकर, सुभाषराव इंगळे, शिवानंद बंडे, भासगे,सुप्रभात मित्र मंडळ, जिप्सी मॉर्निंग ग्रुप, संजीवनी सकाळ, आर्ट ऑफ लिविंग, वैद्यकीय संस्था, इमा, मायबोली, रोटरी क्लब, स्वामी समर्थ मंडळ, मानवता विचार मंच, पुंडे हाॅस्पीटल कर्मचारी, पत्रकार, डॉक्टर्स, वकील, बा-हाळी, जांब, होनवडज, कंधार परिसरातील व्यक्ती, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी केले तर आभार डॉ. गौरव पुंडे यांनी मानले. वीरभद्र मठपती व संच यांनी पसायदान गायले. पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पुण्यनगरीचे ॲड. संदीप कामशेट्टे यांची जिल्हा पत्रकार संघाच्या संघटकपदी निवड झाल्याबद्दल व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्याख्यानमाला विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला.भाग्यश्री जाधव यांच्या पुरस्कार वितरणानंतर चाहत्यांनी सत्कार करण्यासाठी एकच गर्दी केली. पत्रकार संघ, जिप्सी माॅर्निंग ग्रुप, वैद्यकीय संस्था, सुप्रभात मित्र मंडळ, होनवडज ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात अभंग पुस्तकालय नांदेड, कुरुडे आणि इंद्रजीत देशमुख यांच्या अनेक ग्रंथांचे प्रदर्शन भरले. त्यात ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी होती.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!