नांदेड। गुरुवर्य श्रीधर धोंडगे हे 90 व्या वर्षी हि सतत 40 वर्षा पासुन पायी दिंडी चालवत आहेत. हे तरुनाईला प्रेरना -प्रोत्साहन देनारा उपक्रम आहे असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे जेष्ठ नेते राम अय्यर यानी केले.
नांदेडच्या आसना नदि पुलालगत सदरिल दिंडीचे आगमन व्यसन मुक्ती केन्द्रात होताच दिंडीचे जंगी स्वागत करुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अ भा महामंत्री डॉ. मनिश वडजे, अनंत महाराज कापसिकर, लक्षमीबाई घोरबान्ड, सरुबाई देशमुख, गोविन्दराव पांचाळ आदिसह शेकडो पदयात्री हे सुद्दा 40 वर्षा पासुन हाती भगवा झंडा, टाळ ,वीणा घेउन श्री देवा दत्ता दत्ता, देवा दत्ता, देवा दत्ता दत्ता, गोपाला गोपाला देवकि नन्दन गोपाला…हरिनामाचा गजर करित माहुरला रवाना झाले.
महा प्रसादाचे कामी, सत्यनारायन पांचाळ, संकेत अय्यर, सचेतना अय्यर, अर्चना हटकर, अर्जुन काळे, संजय कदम, अवन्तीबाई, संजीव रामगिर्वार, मंगल कांबळे, विश्वास चव्हान, श्रीकान्त निलेकर, सुशमा गायकवाड, विमलबाई मसलकर आदिनी योजनाबध्ह सेवा रुजु केली.