
लोहा| सायन्स आँलंम्पियाड फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत पारडी लोहाच्या सह्याद्री इंग्लिश स्कुल शाळेतील ३९ विद्यार्थी मॅथेमॅटिकऑलिम्पियड स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले .संस्थापक सुदर्शन शिंदे व जयश्री शिंदे या दाम्पत्याने शैक्षणिक गुणवता ग्रामीण भागात टिकविण्यासाठी विविध शालेय उपक्रम राबविले आहेत.

सह्याद्री शैक्षणिक संकुलाच्या वतीने – इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स आँलंम्पियाड या परीक्षेत इयत्ता पहिली ते दहावीचे एकूण 39 विद्यार्थी सहभागी करण्यात आले होते .यात २४विद्यार्थ्यांना गुणवत्ता सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. निकालामध्ये सह्याद्री शैक्षणिक संकुलाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे .यामध्ये 12 विद्यार्थी दुस-या फेरीसाठी पात्र झाले आहेत.03 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. त्यासोबतच 24 विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. तर एका विद्यार्थ्याला विशेष प्राविण्यबद्दल प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिली मधून सानवी सचिन लांडगे , सुधांशु शिवराज पवार इयत्ता दुसरी मधून श्रेयस काशिनाथ पांचाळ, समर्थ गजानन गीते ,मनश्री लक्ष्मण मोरे, यांचा समावेश आहे. तर इयत्ता तिसरी मधून इशान किशन नीटुरे, शौर्या रवी आंबेकर , आराध्य शैलेश बिस्मिले, शरयू शिवराज पवार तर इयत्ता चौथी मधून अर्णव बसवराज लोहारे, तृप्ती कदम ,विद्या तुळशीराम जोरूळे ,इयत्ता पाचवी मधून सह्याद्री सुदर्शन शिंदे ,आरव चंद्रकांत वाडकर, श्रावणी संदीप सोनवळे, चैतन्य सच्चिदानंद सोरडगे ,अर्णव गोविंद मोरे यांचा समावेश होता. तर इयत्ता सहावी मधून आदित्य अंगद सूर्यवंशी, गोविंद माधव केंद्रे, विकी विठ्ठल गड्डमवाड, आर्या गजानन तेजबंद,इयत्ता सातवी मधून कृष्णा प्रभाकर कदम, प्रतीक्षा गजानन मोहिते ,श्रावणी धोंडीराम तोंडारे, त्यासोबतच इयत्ता आठवी मधून परमेश्वर सुरेश गायकवाड, शिवम माधव लोखंडे ,संतोषी गजानन स्वामी, तर इयत्ता नववी मधून श्रुती गणेश जोडराणे व इयत्ता दहावी मधून गौरी धनंजय कोटलवार, ओम संतोष सेवनकर , अंकिता अरुण पारेकर, आदिनाथ माधव कुरडे या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश आहे .

या यशाबद्दल शाळेचे संचालक सुदर्शन शिंदे संचालिका सौ जयश्री ताई शिंदे, सह्याद्री शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य नागेश हिरास , इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नंदकिशोर मेकाले सर, साई कुमार दहिवाळ ,शाळेचे उपमुख्याध्यापिका सुप्रिया वाडेवाले मॅडम ,प्री प्राइमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी धोंडगे, शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक सुमित, राजीव, श्रद्धा पाटील मॅडम, ओम किरण शिरगे,गवते व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

