
अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील डौरप्रमाणे नांदेड जिल्ह्यात डिजीटल अंगणवाडी गावकऱ्यांनी कराव्यात असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण यांनी डौर येथे केले. यावेळी डौर ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच,व सदस्यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, बालाजी गव्हाणे,सरपंच राधा आढाव,माजी सरपंच डॉ.मनोजकुमार राठोड, भाऊरावचे संचालक लालजी कदम,बळवंत इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गावातील विविध विकास कामाबद्दल माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने बांधण्यात आलेल्या डिजिटल अंगणवाडी आणि ग्रामपंचायतीचे काम पाहून समाधान व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी उपसरपंच निर्मला गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य,रामा जाधव,गोदावरी शिंदे,बाळू पाटील धुमाळ,शंकर ढगे,अनिता राठोड,नारायण आढाव,नरोजी आढाव,विलास शिंदे,व्यंकटी जाधव, विठ्ठल शिंदे,नारायण साबळे,रामराव राठोड,केशव गायकवाड,राम गाडेकर,शंकर कांबळे, ग्रामसेवक सुरेश पत्रे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

