उस्माननगर, माणिक भिसे। पृथ्वी तलावावरील प्रत्येकानी पंचशील तत्त्वाचे पालन करून त्यानुसार जगण्याचा प्रयत्न केल्यास जीवन सुखकार होते. गौतम बुद्धांनी सर्व मानव जातीला जीवन जगण्याचा मार्ग दाखवून प्रत्येक विचार आंधळेपणाने न स्वीकारता बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहावा., असा संदेश बुद्धांनी हजारो वर्षांपूर्वी दिलेला आहे., याचा अंगीकार सर्वांनी करावा अशी धम्मदेशना पूज्य भदंत बी.संघपालजी महाथेरो ( राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष भिकू संघ) यांनी शिराढोण येथील कार्यक्रमात दिली.
शिराढोण ता.कंधार येथील पंचशील बुद्ध विहार येथे नुकतेच शांतीदूत बुद्ध विहारात संबोधी ग्रंथालयाचे उद्धघाटन , भारतीय बौद्ध महासभा शाखेचे अनावरण , आणि गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तथा अध्यक्ष समता सैनिक दलाचे आदरणीय डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते उध्दघाटन झाले. तर बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना पुज्य भदंत बी.संघपालजी महाथेरो ( राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तथा राष्ट्रीय अध्यक्ष भिकू संघ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी पंचशील,त्रिशरण , सामूहिक पठण करण्यात आले.
यावेळी धम्मविचार पिठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.एम.वाघमारे ( भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष भिक्कू संघ ) हे होते . तर विशेष उपस्थिती मा. एस.के.भंडारे ( रा.उपा. तथा प्रभारी म.रा. व स्टाॅप ऑ. समता सैनिक दल मुंबई ),बी. एम.कांबळे ( रा.सचिव तथा प्रभारी तेलंगणा राज्य ) आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोविंद नांदेडे , शिवाजीराव कपाळे ,प्रा. शास्त्रज्ञ डॉ.सिध्दार्थ एम.जोंधळे , शिवाभाऊ नरंगले , खुशाल पाटील पांडागळे , संबोधी सोनकांबळे ,दैवशाला गायकवाड, डॉ. करूणा जमदाडे , पांडूरंग पवार , व्यंकटराव पाटील माली पाटील , अशोकराव जोंधळे , भगवानराव कपाळे ,डी.डी.भालेराव , डॉ.महेद्र सांगवीकर ,प्रा. डॉ.कमलाकर राक्षसे , सेवा नि .जेज चावरे , यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोध्दभिक्कू संघाचे चिवरदान ( वस्रदान) देऊन व प्रमुख पाहुणे यांचा शाल हार घालून सन्मानित करण्यात आले.
यावेळी धम्मदेशना देताना पूज्य भदंत बी.संघपालजी महाथेरो म्हणाले की , समाजातील प्रत्येकांनी पंचशील तत्त्वाचा अंगीकार करून त्यानुसार जगण्याचा प्रयत्न केल्यास समाजात शांतता नांदेल ,मी मोठा तू लहान हा वाद राहणार नाही. प्रत्येक जण समाजात शिलाचे पालन करून नीतिमताने वाघेल , बुद्धाचे तत्त्वज्ञान हे अहिंसेचे आहे.मानवाच्या हातून कोणत्याही हिंसा करत नाहीत , हिंसा करू देत नाहीत ,आणि हिंसेसाठी दुसऱ्याला प्रवर्त करीत नाहीत.
एखाद्याचे मन बोलून दुखणे , ही सुद्धा एक प्रकारची हिंसा होय . तेव्हा बुद्धाचा धम्म आचरणात आणणे अवघड नसले तरी सोपेही नाही ,असे सांगून भदंत महाथेरो म्हणाले ,जो समाज संघटित असतो नीतीमतेवर चालतो नेहमी विचाराची देवाणघेवाण करतो. वडील व्यक्तीचा आदर करतो संघटनेला महत्त्व देतो. त्या समाजाला कोणीही गुलाम बनू शकत नाही .कारण तो समाज जागृत असतो माणसाने नेहमी जागृत असावे .,प्रत्येक विचार बुद्धाच्या कसोटीवर तपासून घ्यावा. आंधळेपणाने आंधळे विचार स्वीकारू नये , नसता माणसाचा घात होऊन माणूस दु :खी होतो .गौतम बुद्धाच्या काळातील अनेक प्रसंग व घटना सांगून बुद्धाच्या धम्मनुसार चालण्याचा मार्ग सांगितला.
यावेळी डॉ.भिमराव आंबेडकर म्हणाले की ,ज्या व्यवस्थेने माणसाचं माणूस पण नाकारल होते , त्याच माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या ओटीत टाकून आपणास माणूसपण बहाल केलं. बौद्ध धम्माचा पवित्र विचार इथल्या माणसाच्या मनामनात रूजवीला. हा विचार पुन्हा समजावून सांगण्यासाठी बुद्ध , फुले ,शाहू , आंबेडकर चळवळ गतिमान करण्याचे आवाहन राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तथा अध्यक्ष समता सैनिक दलाचे आदरणीय डॉ.भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले.फुले, शाहू, शिवाजी महाराज म.बसवेश्वर ,डाॅ. आंबेडकर आण्णा भाऊ साठे, यांच्या विचारातील चळवळीचे गाव म्हणून परिचित आहे.
या गावात आज बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे .तेव्हा प्रत्येक तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता बुद्ध धम्माच्या विचाराचा अंगीकार करावा, .भारत देश ही बुद्धाची जन्मभूमी म्हणून अनेक देश भारताकडे आदराने पाहतात ,ज्या व्यवस्थेने माणसाचं माणूस पण नाकारले त्याच माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाच्या ओटीत टाकून आपणास बहाल केले .तेव्हा समाजातील प्रत्येकाने बौद्ध धम्माचे आचरण करावे. धम्मकार्याला प्रत्येकाने वाहून घ्यावे यातच स्वतःचे आणि. समाजाचे हित आहे.विषमता नष्ट करण्यासाठी प्रत्येक अनुयायी यांनी प्रयत्न केले पाहिजेत.असे विचार मांडले.
यावेळी सरपंच खुशालराव पांडागळे , व्यंकटराव माली पाटील,माधवदादा जमदाडे यांनी बुध्दपिठावर विचार मांडले.प्रास्ताविक भगवान राक्षसे यांनी मांडले तर सुत्रसंचलन उत्तमराव गायकवाड , बोध्दाचार्य मनोज जमदाडे यांनी केले.रात्रीला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मनोजराजा गोसावी ( नागपूर ) ,तसेच सुहासिनी शिंदे मुंबई , आकाशराजा यवतमाळ यांच्या भीम गीतांचा प्रबोधन पर भीम गीतांचा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील बौध्द अनुयायी उपासिका उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.