अर्धापूर। तालुक्यातील पार्डी (म) येथील सात्विक साईनाथ जोगदंड वय (६) यांने आलिम्पियाडमध्ये १४४ पैकी १२० गुण प्राप्त करून सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद माऊली यांचा नातू सात्विक साईनाथ जोगदंड इयता पहिली मध्ये नोव्हेंबर-डिसेबर २०२२मध्ये घेण्यात आलेल्या लाजिक्विड्स फर्स्ट स्टेज मेटल अटिट्युड आलिम्पियाड मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत १४४ पैकी १२० गुण प्राप्त करून राज्यात ७ व्या रॅंकमध्ये आला आहे.त्याला सुवर्णपदक मिळाले आहे, त्यामुळे त्याचे शैक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी अभिनंदन केले आहे.