
मुखेड/नांदेड| छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण नारायणराव पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित तालुका नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित शिक्षक मतदार बांधवांना आ. डॉ तुषार राठोड यांनी केले आहे.

आज दि. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर मुखेड शहरातील आर्य वैश्य मंगल कार्यालयात तालुक्यातील शिक्षण संस्था संचालक, शिक्षक बांधवांची शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मुखेड तालुका नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले की मागील अनेक वर्षांपासून आपण निवडुण दिलेल्या आपले प्रतिनिधी हे शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न सभागृहात न मांडता शिक्षकांची दिशाभुल केली आहे. औरंगाबाद मतदार संघातील शिक्षकांचे अत्यंत ज्वलंत प्रश्न असलेल्या जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित संस्था, रखडलेली कर्मचारी भरती, वेतनेतर अनुदानाचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी होऊ घातलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करुन संधी द्यावी देशांचे विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांच्या माध्यमातून आम्ही शिक्षकाचे संस्थाचालकांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर आहोत अशी ग्वाही आ. डॉ. तुषार राठोड यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रा. गंगाधरराव राठोड ,श्रीमती अम्मा देशपांडे, माजी सभापती खुशालराव पा.उमरदरीकर,राजू गरूडकर , डॉ.व्यंकटेश सुभेदार , गंगाधर कावडे , डॉ.वीरभद्र हिमगिरे , माधव राठोड, डॉ कैलास पा. चांडोळकर ,संजय मुंडकर,प्रा.डॉ. रामकृष्ण बदने, प्रा.डॉ. हरिदास राठोड, जोगदंड सर, संजय पाटील, श्रीपत राठोड,गोविंद केंद्रे, मारोती तुपकर, यांच्या सह तालुक्यातील भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचे पदाधिकारी माजी सभापती लक्ष्मण पा. खैरकेकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष गौतम काळे,डॉ. माधव पाटील उच्चेकर, भाजपाचे नेते व्यंकटराव लोहबंदे, राजु घोडके, उत्तम बनसोडे, व्यंकटराव जाधव,गणेश जाधव, हणमंत नरोटे, भाजपा शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान, सुधीर चव्हाण, अनिकेत उर्फ चिंटू कांबळे,समिर गजगे,किरण पा. बोडके, कपिल पा. बनबरे, सचिन पवार, सचिन चव्हाण,गणेश आंबेकर, तालुक्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

