अर्धापूर| तालुक्यातील श्री बसवेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कामठा (बु) येथे कोरोना काळानंतर पहिल्यांदाच वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले . या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड, यांच्या हस्ते तर सरपंच सौ.दुर्गा विश्वनाथ दासे, उपसरपंच रणजितसिंह कामठेकर,संस्थेचे सचिव शंकर कंगारे,उपाध्यक्ष म्हहंतअप्पा बरगळ यांची उपस्थिती होती.
या वार्षिक स्नेहसंमेलनात 32 संचांनी सहभाग घेतला होता. यामध्ये काही धार्मिक व शालेय गीतावर नृत्य,स्वच्छालय विषयी जनजागृती नाटक, असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. ढोलकीच्या तालावर व मराठमोळी गाणं आदी लावण्यावर नृत्य करून प्रेक्षकांना मंत्र मुग्ध केले. सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी येतिहासिक नाटके सादर केली. व राष्टीय भक्तीपर गितावर नृत्य सादर केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला. शाळेतील सर्व विद्यार्थी,पालक वर्ग व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक विश्वनाथ दासे, शिवदास दासे, आनंदराव देशमुख,देवेंद्रसिंघ कामठेकर,विश्वनाथ कल्याणकर, मुख्याध्यापक रविंद्र जिल्हावार, उपमुख्याध्यापक शिवानंद दासे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सूत्रसंचालन अंबादास आटपालवाड यांनी केले.