
लोहा| शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाले आहे. पण शहरात ग्रामीण रुग्णालयाची इमारत होती आणि तेथेच बाह्य रुग्ण तपासणी व्हायची पण नवीन इमारत शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर कोणतीही वस्ती नसलेली भागात स्थलांतरित झाले आहे. जे की सामान्य माणसासह सर्वांच गैर सोयीचे झाले आहे. तेव्हा पूर्ववत जुन्याच रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी विभाग सुरू करावी अशी मागणी लोहा शहर काँग्रेसचे अध्यक्ष वसंतराव पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदने केली आहे.

लोहा येथील ग्रामीण रुग्णालय जुनी इमारत येथे बाहयरुग्ण विभाग पुर्वरत चालू ठेवणे बाबत. काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंतराव पवार,यांनी मागील महिन्यात जिल्हाधिकारी यांना लोहा शहरात जुन्या रुग्णालयात बाह्य रुग्ण तपासणी विभाग पूर्ववत सुरू ठेवावे असे पत्र दिले होते. त्या पात्रान्वये जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा शल्यचिकित्सकी याना पत्र दिले.

त्यात संदर्भीय पत्राची मुळ प्रत यासोबत सलग्न करण्यात येत आहे. नियमानुसार तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत आपल्या स्तरावरुन कळवावे. असे लेखी पत्र काढण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव पवार यांनी आपल्या मागणीचा आग्रक्रमाने विचार करावा व बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवावे अशी मागणी पुन्हा केली आहे.

