
शिवणी,प्रकाश कार्लेवाड। राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आपल्या तेलंगाणा राष्ट्र समिती ‘टीआरएस’ पक्षाचे विस्तारीकरण करत समग्र भारतात पक्षाचा राजकीय झेंड्याचे भारतीय राष्ट्र समिती म्हणजेच ‘बीआरएस’ च्या नावाने रूपांतरित करत आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विविध निवडणुकीच्या रिंगणात बीआरएस सर्वत्र निवडणूक लढवून तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याचे विकास करण्याचे उद्देश मनात ठेवून दि.०५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे पक्ष प्रचार सभेचे आयोजन बीआरएस पक्षाकडून करण्यात आले आहे. या ०५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होत असलेल्या कार्यक्रचे बीआरएस पक्षाचे प्रमुख केसीआर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या सभेला गर्दी जमवण्यासाठी तेलंगणा राज्यातील काही नेते मंडळी कंबर कसली आहे असे दिसून येत आहे.

या अनुषंगाने तेलंगणा राज्याचे वनमंत्री,कायदा व सांस्कृतिक मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी सीमावर्ती भागात कार्यकर्त्यांची जुळवा जुळव करतांना दिसून येत आहे.त्यातीलच एक भाग म्हणून तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ शिवणी येथे दि.२८ जानेवारी शनिवार रोजी कॉर्नर सभा घेत बीआरएस पक्षाचे ध्येय व उद्देश आणि तेलंगणा राज्य सरकार आपल्या राज्यात राबवत असलेले विविध योजना व उपक्रम बद्दल माहिती सांगण्यात येत असून दि.०५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होत असलेल्या सभेसाठी जनतेने यावे,व तरुणांनी बीआरएस पक्षात सामील होऊन महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी पक्षावाढीस योगदान द्यावे असे आवाहन तेलंगाणा राज्याचे वन,कायदा व सांस्कृतिक मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी केले आहे.

यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात कर वसूल केला जातो,त्यावरून पाहता महाराष्ट्र राज्यातील विकास मात्र शून्य आहे.याचे कारण येथील राजकीय मंडळींची उदासीनता पाहता राज्यातील जनता अनेक अडचणींना सामना करत आहे.या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचे म्हंटले तर अवघ्या काही वर्षाखाली आमच्या टीआरएस पक्षाने संघर्ष करत तेलंगाणा राज्य निर्मिती केली,या नंतर आमचे सरकार करण्यात आले.टीआरएस पक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव ‘केसीआर’ यांच्या नेतृत्वात तेलंगणा राज्याचा चेहरा मोहरा बदलून टाकले राज्यात धडाडीने अनेक विकास कामे राबवले गेले.

यामुळे तेलंगणा राज्य विकसित राज्य म्हणून संपूर्ण जगात मानले जाते.यामुळे हा विकास होतो कसा ? हे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील अनेक राजकीय सामाजिक मंडळींच्या वतीने आमचे मुख्यमंत्री तथा बीआरएस पक्षाचे प्रमुख केसीआर यांचे कौतुक होत आहे. हेच ध्येय मनात बाळगून महाराष्ट्र सुद्धा सुजलाम सुफलाम करण्याचं निर्धार आम्ही घेतला आहे.या करिता महाराष्ट्र राज्यातील तरुणांनी केसीआर यांच्यावर विश्वास ठेवून बीआरएस पक्षात सामील व्हावे व नांदेड जिल्ह्यातील जनतेने दि.०५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन करण्यात आले.

भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून साधला सीमावर्ती जनतेची संवाद

किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ येथे निर्मल अप्पारावपेठ तेलंगणा बसला हिरवी झेंडी दाखवत मागील कोरोना काळापासून बंद असलेली बस सेवा सुरळीत केले.तेलंगणातील केसिआर सरकारमधील नामदार इंद्रकरण रेड्डी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवणी, अप्पारावपेठ,गोंडजेवली, दयाल धानोरा,या गावांतील सरपंचांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला आपल्या भेटीदरम्यान त्यांनी असे सांगितले की, तेलंगणातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा अनेक योजना राबवीत असून या योजनामुळे तेलंगणा राज्यातील नागरिकांच्या मनात या सरकारणे आपले स्थान घट्ट केले आहे.नांदेड जिल्ह्याचे सर्व तालुक्यातील जनतेशी आम्ही संपर्क साधत असून पुढील काळात या जिल्ह्यातील नागरिकांची संपर्क वाढवण्यात येईल पूर्वी हा भाग तेलंगणातील बोथ तालुक्याशी जोडलेला होता पण वाटाघाटीत हा तालुका महाराष्ट्रात गेल्याने या भागातील ७५ वर्षानंतर सुद्धा विकास झाला नाही तसेच तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिखर कैलास टेकडीचे विकास करण्यासाठी तेलंगणा सरकारने या देवस्थानच्या विकासासाठी ५० लाखाचा निधी घोषित केला आहे.

या बाबत विकास आराखडा करण्याचे काम चालू असून लवकरच विकास कामांना वेग येईल अशी त्यांनी बोलतांना सांगितले.या वेळी तेलंगाणा राज्यातील टीआरएस पक्षाचे पदाधिकारी महाराष्ट्र पोलीस दलातील विशेष सुरक्षा पोलीस,व इस्लापुर पोलीस प्रशासन,आणि निर्मल जिल्यातील तेलंगणा पोलीस आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी लावले होते. सदरील जनसंवाद दरम्यान तरुण वर्ग बीआरएस पक्षात जाण्यास उत्सुकता दिसून आले.आगामी काळात या पक्षाने जर मुळे रोवली तर किनवट तालुक्यातील राष्ट्रवादी व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बीआरएस पक्षाच्या गळाला लागतील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
बीआरएस पक्षाचे तेलंगणा राज्यात राबवत असलेले विविध योजना व उपक्रम आणि प्रमुख मुद्दे
माझे गाव माझी शाळा,रयतु बंधू,विधवा पेन्शन,बिडी कामगार पेन्शन, विकलांग पेन्शन,राज्यातील सर्व पत्रकारांना मुक्तमध्ये बस प्रवास ,शादी मुबारक,लक्ष्मी विवाह योजना,शेतकऱ्यांना कृषीपंप साठी वीज २४ तास मुक्त,राज्यातील जनतेला मशीन भागीरथाच्या माध्यमातून शुद्ध पेय जल,स्वस्त धान्य दुकानात तांदूळ,महात्मा गांधी स्वच्छता अभियान,प्रत्येक ग्रामपंचायत साठी ट्रॅक्टर,शेती साठी यांत्रिकीकरण प्रत्येक परिवारास घरकुल अभियान, आरोग्य विमा,भोई समजला, दुचाकी,चारचाकी वितरण, अनुसूचित प्रवर्गातील समुदयास दहा लाख थेट अनुदान,धनगर व गोलेवर समाजाला मेंढी वाटप सह इतर अनेक योजना व उपक्रम राबविले जातात.
