
नांदेड| सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारिता कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजविण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची निर्मिती करण्यात आली आहे. जी संघटना सध्या देशात तेवीस राज्यात कार्यरत आहे.

पॉझिटिव्ह जर्नालीझम अजून रुजावे, या उद्देशाने यावर्षीपासून पॉझिटिव्ह जर्नालीझम अवॉर्ड सुरु केला आहे. या स्पर्धेमध्ये रोख रक्कम अडीच लाख रुपये चे चार पुरस्कार, विशेष पाच पुरस्कार, सर्व सहभागी पत्रकार यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार अशी माहिती राष्ट्रीय कार्यवाहक श्री शंतनू डोईफोडे आणि राज्य सल्लागार राम शेवडीकर यांनी दिली. व्हॉइस ऑफ मीडिया राष्ट्रीय अध्यक्ष श्री संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्र मोहन पुपाला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा माने, सेठ ब्रिज मोहन लढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष ब्रिजमोहन लढा यांनी ” व्हॉइस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालिझम “अवॉर्ड 2023ची घोषणा केली.

व्हॉइस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालीझम अवॉर्ड 2023 प्रथम अवॉर्ड 1लाख रु. रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, माणपत्र सन्मान, द्वितीय क्रमांक61हजार रु रोख, स्मृतीचिन्ह, ग्रंथ, माणपत्र सन्मान. महिला पत्रकार 51हजार रु रोख, स्मृती चिन्ह, ग्रंथ, माणपत्र सन्मान, तृतीय क्रमांक41हजार रु. रोख रु. स्मृती चिन्ह, ग्रंथ मानपत्र सन्मान.पाच जनासाठी उत्तर्जनार्थ विशेष पुरस्कार, सहभागी स्पर्धक करिता सहभागी प्रमाण पत्र.सहभागी पत्रकार तया दैनिक, साप्ताहिक प्रतिनिधी आवश्यक असावे. प्रस्ताव देताना संपादक पत्र जोडणे आवश्यक आहे. फेब्रुवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये किमान 42 किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक बातम्या, लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जातील. जानेवारी 2024 मध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विजेत्यांना दिमाख दार सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्र मराठी भाषा पुरती मर्यादित आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचे वरिष्ठ व मुख्य पदाधिकारी मंदार फणसे, संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, अनिल मस्के, विलास बडे, सुधीर चेके पाटील, बालाजी मार गुडे हे निवड प्रक्रिया चे प्रमुख असतील. व्हॉइस ऑफ मीडिया कोकण विभागीय कार्यालय ए ल 30-1201-स्वप्नपुर्ती, सेक्टर 36 खारघर, नवीमुंबई 410210 या पत्यावर प्रस्ताव पाठवावे. व्हॉइस ऑफ मिडियाचे सर्व ठिकाण चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष,सचिव या चार प्रमुख यांना सहभागी होता येणार नाही.

शेठ ब्रिज मोहन लढा सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष आशिष ब्रिजमोहन लढा यांचे सहकार्य ने हा पुरस्कार उपक्रम पार पडणार आहे. लढा म्हणाले मला या उपक्रम सहभागी होता आले माझे भाग्य आहे. हा उपक्रम समाजासाठी प्रेरक ठरेल. यासाठी राज्यातील पत्रकार नी सहभागी व्हावे असे आव्हान व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले, महानगराध्यक्ष डॉक्टर गणेश जोशी आणि जिल्हा कार्यकारणी यांनी केले आहे

