
उस्माननगर। येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक एकनाथ केंद्रे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांना लेझीम पथक म्हणून शाळेच्या प्रभातफेरी काढण्यासाठी टी शर्ट ची भेट दिली.

जि.प. कें. प्रा. शाळेतील आर्दश उपक्रमशील , सांस्कृतीक, क्रिंडा , शैक्षणिक स्पर्धा परिक्षा असे वेगवेगळे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारे एकनाथ केंद्रे यांचा ३० जानेवारी २०२३ रोजी वाढदिवस साधेपणाने साजरा करून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी लेझीम पथक तयार करून शाळेचे वेगळेपण दिसावे म्हणून केद्रे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना टि शर्टचे शाळेला भेट दिली.विद्यार्थी प्रिय शिक्षकांचा वाढदिवसी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

