
नविन नांदेड। किवळा येथील हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरस शरीफ निमित्ताने आयोजित कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला,या मानाच्या कुस्तीची सुरूवात युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर,व मान्यवरांसह गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी माळेगांव कुस्तीचा मान मिळविणाऱ्या किवळा येथील अच्युत टरके हा प्रथम विजेता ठरला यावेळी ग्रामीण भागातील हजारो ग्रामस्थ व विविध जिल्ह्यांतील नामांकित पहेवलवान यांनी हजेरी लावली.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 31जानेवारी२३ रोजी हजरत शाह हुसेन मस्तान साहेब दर्गा किवळा ता.लोहा.ऊरूस शरीफ निमित्ताने श्री रूद्रगिर गुरू दयाळ गिर महाराज मठ संस्थान किवळा , व समस्त गावकरी मंडळी किवळा यांच्या वतीने कुस्ती दंगल आयोजन३१जानेवारी २३ रोजी करण्यात आले होते, यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्हायातुन व तालुक्यातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला होता.

या कुस्ती दंगलची मानाची कुस्ती युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांनी लावली .पंच म्हणून, निरंजन टरके,जगन्नाथ टरके,राजु टरके, प्रभाकर टरके, भाऊराव टरके, व्यंकटी टरके, यासिन पठाण यांनी काम पाहिले,तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती लोहाचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, विनायक पाटील काळे संरपच वडगाव, संरपच भिमराव लामदाडे टाकळगाव ,रंगराव पाटील लोंढे,शिवराज तांबोळी, मुरलीधर पाटील ढगे ,विशाल दमकोडंवार ,ग्रामविकास अधिकारी तथा जिल्हा परिषद कर्मचारी पंतसंसथा उपाध्यक्ष अमृतराव शिंदे यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होती.
शेवटची कुस्ती माळेगांव केसरी विजेता तथा किवळा रहिवाशी पहेलवान अच्युत दिगंबर टरके यांनी जिंकली तर दुसरी कुस्ती हनमुंत गाढे बळेगाव यांनी जिंकली .यात विविध जिल्ह्यांतील नामवंत पहेलवांनानी आखाडा गाजवुन व डावपेच आखात कुस्त्या जिंकल्या.

यात्रा कमेटीचे श्री गुरू रूद्रगिर महाराज, माजी सभापती शंकर ढगे, माजी संरपच साईनाथ पाटील टरके , सामाजिक कार्यकर्ते अजगरसाब हुसेन पठाण, मुस्तफा मदरशा पठाण,वली साब पठाण,फारूक पठाण, यांच्या ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष व्यंकटी पाटील टरके, ऊपसंरपच केशव पाटील टरके व समिती पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य, यांच्या सह गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

यावेळी सोनखेड पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक परिहार व पोलीस नाईक कदम, नागरगोजे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, अंत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही कुस्ती दंगल संपन्न झाली. या वेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व विजयी पहेलवान यांनी हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा येथे दर्शन घेतले.

