
नांदेड| नविन नांदेड परिसरातील कच्छवेज् गुरुकुल इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना अधिक दृढ व्हाव्यात यासाठी बुधवारी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मागील दोन वर्षात आभासी जगतातून शिकलेल्या नवनवीन प्रयोगांचा अखेर प्रत्यक्षरीत्या शुभारंभ झाला.

कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद नांदेड चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुधीर ठोबरे साहेब यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून अविरत प्रिंटिंग प्रेस चे संचालक श्री. देवदत्त देशपांडे व श्रीमती कविता देशपांडे ह्या होत्या. कार्यक्रमाचे संभाषणीय भाषणातून.श्री सुधीर ठोंबरे साहेब यांनी सांगितले कि मुलांनी केवळ परीक्षांचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित न करता विविध क्षेत्रे आणि संकल्पनांचा शोध घेण्यास सुरुवात करावी त्यासोबतच विद्यार्थीनी विज्ञाना ची कास धरावी व विद्यार्थी ना प्रोत्साहित करण्यासाठी भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेने दर सहा महिन्याला आयोजित करावे.विद्यार्थी नी स्वतः केलेले विज्ञान प्रयोग पाहून आनंद घेतला व त्याचे कौतुक केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दुर्गादेवी कच्छावे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कोव्हीडंनंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेचा भाग होण्यासाठी आणि वयोमानानुसार विज्ञान संकल्पना प्रदर्शित करण्याची हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध विषयांवर बनवलेले विज्ञान प्रकल्प पाहायला मिळाले.

पाणी व पाण्यापासून विजेची निर्मिती,पाणी आणि हवेचे गुणधर्म, जलचक्र, ठिबक सिंचन, माती आणि जलसंधारण, शरीराची वेगवेगळी कार्ये, पौष्टिक अन्न आणि निरोगी शरीरासाठी त्याचे योगदान, सूर्यमाला, खगोलशास्त्र, हायड्रोलिक जॅक, आणि ग्लोबल वार्मिंग या संकल्पनावर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केले. त्यांनी त्यांच्या पालकांच्या मदतीने त्यांनी बनवलेल्या तपशीलवार मॉडेल्स आणि तक्त्यांसारख्या प्रात्यक्षिकासह सादर केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक श्री बालासाहेब कच्छवे , उपमुख्यध्यापक श्री सचिन वसरणीकर, प्रशांत बारादे, बाळू मजरे,आबासाहेब शिशोदिया,मीरा बाचेवाड,भाग्यश्री तेहरा,शिल्पा कतेवार, शिला अनंतवार, उषा किनकर, सीमा मुरकुटे, सुनीता सावते उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले .

