
हदगाव, गजानन जिदेवार। हदगाव तालुक्यातील मोजे तामसा येथे हदगाव चे तहसीलदार जीवराज डापकर यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मौजे तामसा येथील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत गावकऱ्यांच्या जे काही समस्या आहेत ते जाणून घेऊन त्यांना सखोल असे मार्गदर्शन केले व जिल्हाधिकारी यांनी आदेशित केलेल्या म. ज. म. अ. १९६६ चे कलम ४२ ब व ड ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार आज तहसीलदार साहेब यांनी ग्रामपंचायत कार्यालय तामसा येथील सर्व नागरिकांना म.ज.म. अ. कलम १९६६ चे कलम ४२ अ, ब ,क ,ड अंतर्गत गावठाणापासून २०० मीटरच्या परिक्षेत्रातील एन ए गावठाण जमीन ,गायरान जमीन , इनामी जमिनी बद्दल सर्व प्रकरणाबद्दल खातेधारकांना ४२ ब व ड प्रकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

या बैठकीला मंडळअधिकारी संगीता डाकणवाले मॅडम ,ग्रामविकास अधिकारी शेळके साहेब , तामसा सज्जा चे तलाठी रुपेश जाधव साहेब , जांभळा तलाठी सज्जाचे कल्याणकर मॅडम , तलाठी सज्जा घोगरीच्या वैशाली गोडबोले मॅडम , सरपंच बालाजी महाजन, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक तसेच सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

