
नांदेड| येथील पीपल्स हायस्कूल मध्ये ई.स.१९७७ साली दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन सोहळा गुरूजन वर्गांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

यावेळी ई.स.१९७७ या वर्षी शिकवलेल्या शिक्षकांची विद्यार्थ्यांसोबत भेट झाली त्यात आदर्श गुरुजी सुभाष बाराळे, त्रंबक पांडे, के.डी. जोशी, कानडखेडकर , करडखेडकर, नारवाड , बैनवाड ,पांडेबाई, एकटाटेबाई, आरोळेबाई या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. उपस्थित गुरूजन वर्ग व सर्व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी शाळेच्या एका वर्गात दाखल झाला तेंव्हा अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदी-आनंद भाव दृष दिसत होता.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी वर्ग घेतला. करडखेडकर सरांनी विज्ञान शिकवले तर आरोळी बाईंनी मराठी शिकवले व लगेच तोंडी परीक्षा घेण्यात घेतल्या.आयोजीत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षिकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.ई.स.१९७७ च्या दहावी वर्गातील विद्यार्थी अनिल अमृतवार, सुधीर बोंडेकर, शशिकांत गोहेल,डॉ. दीपक गोरे, मुकुंद जाधव, डॉ. सुरेश पवार, अनिल शर्मा, सुनील शिंदे, गंगालाल यादव, श्रीकांत अकोलकर, विनिता आरोळे, शकुंतला मोकळे, व्यंकटेश कवटेकवार, रत्नाकर पोफळे, मुन्ना बजाज,डॉ. दीपक मांडाखळीकर, अमोल कुलकर्णी, परमेश्वर कलशेट्टी, गोपाल तिवारी आदी विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यातर्फे सुनील शिंदे, सुधीर बोंडेकर, अनिल अमृतावार यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आभार मानले. सुनील म्हणाला – आज जे काही आम्ही पदावर आहोत, कर्तुत्वान झालोत, समाजात प्रतिष्ठित नागरिक म्हणून वावरतो हे सर्व तुम्हा शिक्षकांचे देन आहे. तुम्हीच आम्हाला घडवलं असे मनोगत सुधीर बोंडेकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सर्वजण भाऊ होते, जुना आठवणी ताज्या होत होत्या. जे शिक्षक व विद्यार्थी हयात नाहीत त्यांची याप्रसंगी आठवण करण्यात आली. कार्यक्रमानंतर सुरुची भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. २८ जानेवारी रोजी शनिवारी सर्व विद्यार्थी व शिक्षिकांनी जांभूळ बेट या पर्यटन स्थळी भेट दिली व लहानपण आठवत झोका, क्रिकेट खेळले तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पण पार पाडला.

