
नवीन नांदेड। वाजेगाव ओम नगर येथे साईबाबा मुर्ती स्थापना वर्धापनदिन निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, साईबाबा मूर्ती स्थलांतर व श्रीमद् भागवत कथा आणि कलशारोहण सोहळ्याचे आयोजन दिनांक २ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित केले असून या सोहळ्यात भागवताचारय साध्वी सोनाली ताई करपे ह्या आपल्या समधुर वाणीतुन कथा सांगणारा असून दररोज सायंकाळी नामांकित किर्तनकार यांच्ये भजन होणार आहे या सप्ताहाचे आयोजन डॉ. आर. एस. सावरगांवकर यांनी केले आहे.

गेल्या २४ वर्षा पासुन साईबाबा मुर्तीस्थापना वर्धापनदिना निमीत्ताने किशन महाराज बरबडेकर यांच्या प्रेरणेने हा सप्ताहा अविरत चालु आहे,या सप्ताहात दैनंदिन काकडा, ज्ञानेशवरी पारायण,गाथा भजन,भागवत कथा, सायंकाळी हारीपाठ, रात्री हारीकिर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भागवत कथाकार साध्वी सोनाली ताई करपे यांच्या समुधर वाणीतुन २ ते १०फेब्रुवारी दरम्यान १ ते ५ या वेळात तर रोजी ३ फेब्रुवारी रोजी मुर्ती स्थापना व ९ फेब्रुवारी रोजी ज्ञानेशवरी पारायण,१० ला कलशारोहण सोहळा व १० फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने सांगता होणार आहे.

या सप्ताहात दि. २ फेब्रुवारी रोजी हभप. चंद्रकांत महाराज लाठकर, दि. ३ फेब्रुवारी रोजी सौ.कांचनताई जगताप नाशीक, दि. ४ फेब्रुवारी रोजी हभप महादेव महाराज राऊत बीड, दि. ५ फेब्रुवारी अंजलीताई केंद्रे लातुर, दि. ६ फेब्रुवारी रोजी हभप निवृती महाराज इंदुरीकर समाज प्रबोधन, दि. ७ फेब्रुवारी शितलताई साबळे मालेगाव, दि.८ फेब्रुवारी रोजी हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, दि.९ फेब्रुवारी रोजी हभप वनिताताई पाटील भिवंडी, मुंबई, दि. १० फेब्रुवारी रोजी किशन महाराज बरबडेकर यांचे काल्याचे किर्तन होईल, या अखंड सप्ताहास व भागवत कथेचे लाभ सर्व भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक डॉ.आर.एस. सावरगावकर यांनी केले आहे.

