

लोहा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या निष्क्रिय प्रशासनामुळे स्वच्छतेचे तीन तेरा झाले आहेत. ज्याला टेंडर दिले त्याच्याकडे सफाई कामगार संख्या जेमतेम असतानाही मुख्याधिकारी यानी एकदाही लक्षवेधी कार्यवाही केली नाही. तसेच जनावरांच्या बाजारात हौद बांधकाम व खडक- चुरी टाकले त्याची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक होते. पण तसे झालेले दिसत नाही आता तर जनरोष येईल अशीच कृती झाली.

शहरातील जुन्या स्मशानभूमीत कधीच स्वच्छता होत नाही कलालपेठ भागातील दलित वस्तीच्या स्मशानभूमी ची तीच गत आहे .सोमवारी ३०एप्रिल रोजी शहरातील मुख्य स्मशानभूमी अग्निशमन दलाची गाडी लावून सगळी स्मशानभूमी धुतली शिवाय तिन्ही दहिन्या धुतल्या ही बाब चांगली आहे.

स्वछता असली पाहिजे जीवनाचा अंतिम निरोप देणाऱ्या ठिकाण चांगले असावे असं मानले जाते पण तरी शहरात या स्वच्छता बाबत चर्चा वेगळीच सुरु झाली की सोमवारीच कशी काय स्मशानभूमी धुतली(?) एरवी का धुतली नाही आताच कसा धूळ झाल्याचा साक्षात्कार झाला(?) नगर पालिका प्रशासनाने सर्वांना समान न्याय दिला पाहिजे ही सार्वजनिक मालमता होय. कोण्या ठरविकांच्या साठी जर होत असेल तर ते चुकीचे होय.आणि नेमके तेच तर होत नसावे ना(?) हा सवाल आहे.

मुख्याधिकारी यांना या पाण्याने स्मशानभूमी धुतली याबाबत विचारले असता मला काही माहीत नाही निवडणूक ड्युटीवर आहे असे सांगून त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. कार्यालयिन अधीक्षक उल्हास राठोड यांच्याशि संपर्क साधला असता आजच म्हणजे सोमवारीच कसे काय स्मशानभूमी धुतली गेली असं विचारले असता दोन दिवस सुटट्या होत्या. म्हणून आज धुतली यापूर्वी कधी स्मशानभूमी का धुतली नाही(?) असे उपप्रश्न केल्यावर त्यांनी बोलणे टाळले. म्हणजे एकंदरीत नगर पालिकेच्या प्रशासनात कोणाचा कोणाला ताळमेळ नाही असे दिसते.

स्मशानभूमी स्वच्छता राखणे आवश्यक आहे पण सोयुनूसार ती स्वच्छता करणे हे चुकीचे आहे आणि ते टाळून दरमहा या तिन्ही स्मशानभूमी व पाण्याने धुणे व दफनभूमी स्वच्छ करणे आवश्यक आहे. ते पालिकेने करायला पाहिजे अथवा सेवाभाव असलेल्यांचा पुढाकार घ्यायला हवा. एकाकी साक्षात्कार होतो. ती बाब पायघड्या टाकण्या सारखे आहे. असे वाटते अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित चे तालुकाध्यक्ष सतीश आनेवार, यांनी व्यक्त केली.

