Tuesday, March 21, 2023
Home लेख मंदिरे आणि मंदिरातील धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ सिद्ध व्हा -NNL

मंदिरे आणि मंदिरातील धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ सिद्ध व्हा -NNL

मंदिर सरकारीकरणाच्या विरुद्ध अभेद्य हिंदुसंघटन : ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’

by nandednewslive
0 comment

प्रस्तावना मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेतहजारो वर्षांपासून हिंदु संस्कृतीचे रक्षणजतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका अनन्यसाधारण आहेमंदिरांना हिंदु धर्माचे वैभव मानले जातेत्यातून मिळणार्‍या चैतन्यामुळेच आधुनिक काळातही समाज मंदिरांकडे आकर्षिला जात आहेअसे असले तरीबहुसंख्यांक हिंदूंच्या देशात आज मंदिरांतील देवनिधीवर डोळा ठेवून ती ताब्यात घेतली गेली आहेतमंदिरांचे सरकारीकरण झालेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराच्या देवनिधीचा गैरवापर होतांना दिसतोअनेक मंदिरांवर नेमलेल्या शासकीय समित्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेतअनेक मंदिर समित्यांच्या विरोधात न्यायालयात खटले चालवले जात आहेतसरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या धर्मपरंपरांमध्ये हस्तक्षेप केला जात आहेहे गैरप्रकार रोखण्यासाठी मंदिरांच्या प्रतिनिधींचे अभेद्य संघटन होणे आवश्यक आहेयातून हिंदूंनी नुसते जागृत होऊ नयेतर संघटित होऊन या विरोधात व्यापक जनचळवळ राबवणे काळाची आवश्यकता आहेत्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजेच ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ जळगाव येथे हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळपद्मालयजळगाव यांच्या वतीने आणि फेब्रुवारी 2023 या दिवशी मंदिरे आणि मंदिरातील धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहेज्यामध्ये मंदिर सरकारीकरणाच्या विरुद्ध अभेद्य हिंदुसंघटन कसे आवश्यक आहेयाविषयी योग्य दिशा मिळेलत्यासाठी हा लेखप्रपंच !

1. महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असलेल्या देवस्थानातील भ्रष्टाचार ! : मंदिरे ही दैवी चैतन्याची केंद्रे आहेतअसे असतांना केवळ सुव्यवस्थापनाच्या नावाखाली त्या मंदिरांतील अर्पणावर डोळा ठेवून काही मंदिरांचे सरकारीकरण कऱण्यात आलेमहाराष्ट्रातील कोल्हापूरतुळजापूरपंढरपूर आदी काही सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे ‘सरकारीकरण’ झाले आहेज्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहेत्या मंदिरांच्या न्यासांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारतसेच अनागोंदी कारभार आढळून येत आहेनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी येथील ‘श्री साईबाबा संस्थानशिर्डी’ हे शासनाच्या नियंत्रणात आहेशिर्डी येथील ‘श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट’ने वर्ष 2015 च्या नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीच्या नियोजनासाठी साहित्य खरेदी करतांना ते चढ्या दराने खरेदी करून 66 लाख 55 हजार 997 रुपयांचा घोटाळा केला असल्याचे उघड झाले होतेएकूणच राज्यात जेवढ्या मंदिरांना शासनाने ताब्यात घेतले आहेत्यात प्रत्येक ठिकाणी अशीच घोटाळ्यांची मालिका दिसून येतेसरकारीकरण झालेल्या साईबाबा संस्थानाने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या काही घंट्यांच्या दौर्‍यांसाठी 93 लाख रुपये उधळलेपंढरपूरच्या मंदिर समितीने तर गोशाळेतील गोधन कसायांना विकून त्याचे पैसे केलेमुंबईतील सिद्धीविनायक मंदिराचे कोट्यवधी रुपये राजकारण्यांच्या नातेवाइकांच्या न्यासामध्ये वळवले आहेतयावरूनच मंदिर सरकारीकरणाची भयावहता लक्षात येते.

2. देवालयांच्याच संपत्तीवर वक्रदृष्टीहा हिंदूंवर मर्माघातच ! : सद्यस्थितीत रुपयाचे होणारे अवमूल्यन थांबवण्यासाठी सरकारची वक्रदृष्टी असाहाय्य हिंदूंच्या देवळातील अमाप संपत्तीवर पडलीहिंदूंच्या श्रीमंत देवालयांनी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची घोषणा करावीअसा भारतीय रिझर्व्ह बँकेने आदेश काढला आहेही गोष्ट निश्चितच हिंदूंवर मर्माघात करणारी आहे असा आदेश मशिदी वा चर्च यांच्या संदर्भात कधी काढला गेला आहे का ?

3. देवनिधीचा अपवापर : मंदिरांचे केवळ सरकारीकरण झाले नाहीतर देवनिधीचा गैरवापरही केलाश्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मंदिरांना पर्यटनाचा दर्जातसेच मंदिराचे व्यापारिकरण कसे करता येईलया विषयावर दिनांक 28 आणि 29 जानेवारी 2006 या दोन दिवशी मुंबईतील आयटीसी ग्रँट सेंट्रल शेरेटन या सप्ततारांकित हॉटेलात आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होतीत्यात भक्तांनी अर्पण केलेल्या 24 लाख रूपयांचा चुराडा सरकारी विश्वस्तांनी केलायापूर्वी सरकारीकरण झालेल्या अनेक मंदिरांमध्ये भ्रष्टाचार झालाहे उघड आहेअसे असतांनामंदिरांचे सरकारीकरण झाल्यानंतर पूर्वापार चालत आलेल्या प्रथा बंद करणेत्यात मनमानी पालट करणेधार्मिक विधींसाठी आवश्यक असलेला कालावधी कमी करणेतसेच परंपरागत पुजार्‍यांना हटवून ‘पगारी पूजारी’ आणले आहेत.

4. धर्मशास्त्राचे पालन न करणे : कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्यावर उल्लेखित भ्रष्टाचाराच्या संदर्भात कोणतीही भूमिका न मांडणार्‍या शासनाने घाईघाईने मार्च 2018 मध्ये मंदिरातही पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय घेतलापश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने महालक्ष्मी मंदिरातील प्राचीन मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ बुजवून तेथे शौचालय बांधण्याचे दुष्कर्म केलेअनेक वेळा निवेदनआंदोलन होऊनही त्या संदर्भात कोणतीच कृती न केल्याने अखेर शिवसेनेचे कोल्हापूर येथील आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ते पाडलेवर्ष 2014 मध्ये शासनव्यवस्थेत बसलेल्या काही धर्मविरोधकांनी पंढरपूर येथील श्रीविठ्ठलाची पूजा करणार्‍या बडव्यांना हटवून नवीन पुजार्‍यांची नेमणूक केलीअशी अनेक उदाहरणे आहेत.

5. मंदिरांचे विश्वस्त अन् पुजारी यांचा सहभाग : अन्य पंथियांना त्यांचा पंथपंथातील शास्त्र यांची बर्‍याच अंशी माहिती असतेएखाददुसर्‍या प्रसंगात ते संबंधित पंथांच्या मार्गदर्शकांचाही सल्ला घेतात आणि रणनीती सिद्ध करताततोच भाग जेव्हा हिंदु लोकप्रतिनिधींच्या संदर्भात येतोतेव्हा त्यांना मंदिरांचे महत्त्वहिंदु धर्मधर्मशास्त्र यांच्याविषयी जाण नसतेअसे लक्षात येतेत्यासाठी हिंदु धर्मधर्मशास्त्र आणि देवता यांवर श्रद्धा असलेल्यांनीच मंदिराचे प्रतिनिधित्व करावेहे हिंदूंनी ठणकावून सांगायची वेळ आली आहे.

मंदिरांचे विश्वस्त अन् पुजारी यांनी मंदिररक्षणार्थ खालील प्रकारे सहभागी झाल्यास मंदिरांतील पावित्र्याचे निश्चितच रक्षण होईल !

1. मंदिरांचे सरकारीकरण आणि सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील गैरप्रकार यांच्या विरोधात वैध मार्गाने सर्व स्तरांतील लोकांमध्ये जागृती करा !

2. मंदिरांशी संबंधित विद्यमान कायद्यांमुळे (उदा. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’तसेच मंदिरांचे सरकारीकरण करणार्‍या कायद्यामुळेहोणार्‍या दुष्परिणामांचा अभ्यास करून ते दूर व्हावेतयासाठी आवश्यक ते प्रयत्न करा !

3. प्रत्येक क्षेत्रातील मंदिरांचे विश्वस्तपुजारीभक्तहितचितंक आदींचे संघटन करा !

4. मंदिरांच्या धर्मपरंपरांचे पालनप्रथांचे रक्षणतसेच मंदिरांतील पावित्र्याचे रक्षणस्वच्छतानियमांचे पालनशिस्त इत्यादींविषयी आग्रही रहा !

5. हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यासाठी गुरुकुलवेदपाठशाळातसेच गोशाळा चालू करून मंदिरांचा खर्‍या अर्थाने हिंदु समाजाला लाभ व्हावायासाठी प्रयत्न करा !

6. मंदिर परिषदेच्या कार्यात सहभागी व्हा आणि अन्यांनाही सहभागी करून घ्या !

– श्रीसुनील घनवटराज्य संघटकमहाराष्ट्र आणि छत्तीसगडहिंदु जनजागृती समिती

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!