
अर्धापूर,निळकंठ मदने। अर्धापूर तालुक्यातील कामठा केंद्रांतर्गत जानेवारी महिन्यातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामदरी येथे संपन्न झाली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जी.एस. सोनटक्के यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करुण ते पुढे म्हणाले की,माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला आहे हे महत्त्वाचे आहे.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय परसबाग निर्मिती स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा धामदरी चा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आल्याबद्दल मुख्याध्यापक बळीराम शिंदे, शिक्षक राम पतंगे,रवींद्र जांभळे,धम्मदीप जोंधळे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष सदस्य यांचा सोनटक्के यांच्या हस्ते सत्कार केला.

याप्रसंगी कोरोना काळात युट्युब,झूम मीटिंग,व्हाट्सअप द्वारे शिक्षण चालू ठेवले त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील महिला शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन सोनटक्के जि.एस.केंद्रप्रमुख व्यंकटराव गीते, केंद्रीय मुख्याध्यापक आनंदराव आवरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी साधन व्यक्ती कांबळे माधव यांनी स्लॅश, असर द्वारे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांत सुधारणा कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की,साहित्य पेटीचा वापर व समता-समानता वागणुकीचा वापर सर्व विद्यार्थ्यांसाठी करावा. पुर्णपणे विद्यार्थ्यांना वाचन लेखन येणे आवश्यक आहे. त्यासाठी कृतीयुक्त शिक्षण देणे आवश्यक आहे,असेही ते पुढे म्हणाले.

धामदरी शाळेतील परसबाग पाहून शिक्षण विस्तार अधिकारी जी. एस. सोनटक्के यांनी शाळेतील सर्व शिक्षक व शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस आशाताई कदम व रामराव कदम यांचे अभिनंदन केले व सर्व शाळांना त्यांनी अशा प्रकारे परसबाग सर्व शाळेत तयार करावी अशी सूचना केली. या केंद्र संमेलनाचे सूत्रसंचालन धम्मदीप जोंधळे यांनी केले.

