Sunday, April 2, 2023
Home कंधार सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थीच्या कलागुणांना वाव: दिलीप बनसोडे, वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात साजरा -NNL

सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थीच्या कलागुणांना वाव: दिलीप बनसोडे, वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात साजरा -NNL

by nandednewslive
0 comment

श्रीक्षेत्रमाहूर, राज ठाकूर। शहरातील राजर्षी शाहू फाउंडेशन द्वारा संचलित जिनियस किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल,या शाळेचा पाचवा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवार रोजी रात्री उत्साहात पार पडला. ‘महाराष्ट्राची संस्कृती’ ‘विविधता मे एकता’ या विषयावरील ‘महाराष्ट्रीयन लोक नृत्य कलेचे’ सामूहिक रित्या विविध कार्यक्रम सादर झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेला ‘पंख’ या लघु चित्रपट मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. शालेय स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यास विद्यार्थोच्या कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक नांदेड जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी सांगितले.

जिनियस किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेतील विद्यार्थी,शिक्षक,पालक,नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थोनी पर्यावरण रक्षन, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, निसर्ग प्रेम, स्वच्छता,हुंडाबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन लोकप्रिय गोंडी, बंजारा,लावणी लोकनृत्य कव्वाली,कोळी,मॉर्डन,भुतिया नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात अधिकच रंगत आणली,संगीत बद्धरित्या साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची गौरव गाथा व देशभक्तीपर नृत्य या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.बालचमुंनी सुप्त कलागुणांनी ओतप्रोत कलाविष्कार सादर करून पालक व माहूरकरांना मंत्रमुग्ध केले.संपूर्ण शिक्षक वृंद यांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळे खूप सुंदर असे परफॉर्मन्स पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाबाराव केशवे हे होते तर उद्घाटक म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून आनंद दत्त धाम चे साईनाथ महाराज वसमतकर,नांदेडचे माजी महापौर श्री व सौ किशोर भवरे,पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.जगताप,संजय पवार,प्रा.राजेंद्र केशवे,पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी, माधवराव पाटील हडसणीकर,नगरसेवक सागर महामुने, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रद्धाताई घोगरे,किसान राठोड,किशोर जगात,गोविंदराव मगरे पाटील,रऊफ भाई सौदागर,नगरसेवक विलास भंडारे, ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे संचालक भाग्यवान भवरे यांनी केले.तर शिक्षण परिषदेचे अध्यक्ष एस.एस.पाटील व इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सुरेख संचालन केले.

स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सुधीर गौरखेडे, उपप्राचार्य आकाश भवरे,वर्षा कऱ्हाळे, अश्विनी भास्करवार, राहुल गिन्हें,प्रफुल्ल भवर,राजू गुलफूलवार, शुभभ भवरे,वैभव भुडाणकर,अहेफाज शेख, प्रशांत देशमुख,शुभम गायकवाड,आकाश राठोड, सोहेल खान,विक्रांत चव्हाण, पुजा कुंभारे,रितू वर्मा,प्रतिभा पाटील, रचना निळे,अल्का राठोड,मनिषा खाडे,नंदा दातिर, पल्लवी पाटील,करिश्मा राठोड, रसीका राठोड, उज्ज्वला झोडे, जानकी आराध्ये, प्रियंका खांडेकर, प्रियांका वांगे,गिता राउत,रेणूका राठौर, संगीता डहाळे, शांताबाई शिंदे,संगीता सोनवने, लक्ष्मी मुकटे, विकास कांबळे आदींनी अथक परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.या सोहळ्यासाठी सर्वांनी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!