
नांदेड। सन 2022 हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करण्यात आले. याचेच औचित्य साधून सबंध देशभर देशवासीयांच्या स्मृती ना उजाळा देण्यासाठी माऊंट लिटेरा झी स्कूलच्या वतीने *अमृत गाथा* या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुणांचा विकास व्हावा शालेय पूरक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधता यावा या दूरदृष्टीने व झी स्कूलच्या प्राचार्या रमिंदर कोर मॅडम यांच्या संकल्पनेतून हा सांस्कृतिक समारंभ साजरा करण्यात आला.

समारंभ प्रसंगी स्वातंत्र्यापासून 75 वर्षाच्या या कालावधीमध्ये चित्रपट सृष्टी मध्ये झालेला बदल ,विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जगाच्या तुलनेत भारताने घेतलेली गरुड झेप, क्रीडा विश्वामध्ये अनेक नवोदित खेळाडूंनी मिळवलेल्या अनेक विविध पदकांची कमाई, बाल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास साधत तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षण क्षेत्रामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती पासून अद्यावत सुरू असलेली शिक्षण पद्धती पर्यंत झालेले नवनवीन बदल अशा वेगवेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून हा नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला .

सांस्कृतिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माऊंट लिटेरा झी स्कूलच्या अध्यक्षा श्रीमती भारतीबाई पवार, प्रमुख पाहुणे मा.श्री.माधवराव पाटील जवळगावकर ( विधानसभा सदस्य, हदगाव.), मा.श्री तुषार राठोड (विधानसभा सदस्य,मुखेड.) मा. सौ.प्रणिता ताई चिखलीकर (जिल्हा परिषद सदस्या,नांदेड) मा. श्री संतोष राठोड (अध्यक्ष वसंतराव नाईक शिक्षण संस्था, वारंगा) झी स्कूलचे संचालक मा.श्री सचिन पवार, संचालिका श्रीमती मीनाक्षी पवार,प्राचार्या रमिंदर कौर (मोदी) सर्व पालक वृंद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

