Wednesday, March 29, 2023
Home नांदेड भारताचे वैद्यकीय,आरोग्य व संशोधन क्षेत्रातील नेतृत्वासाठी “जी-२०” ही सुवर्ण संधी – डॉ. अजित गोपछडे -NNL

भारताचे वैद्यकीय,आरोग्य व संशोधन क्षेत्रातील नेतृत्वासाठी “जी-२०” ही सुवर्ण संधी – डॉ. अजित गोपछडे -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड। भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात आपण G20 चे अध्यक्षपद भुषवित आहोत ही संपुर्ण भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे. यात विविध क्षेत्रांचे आपले ज्ञान,वारसा,वैभव व नेतृत्व जगाला दाखविण्याची एक उत्तम संधी या निमीत्ताने मोदीजींनी सर्वांना उपलब्ध करुन दिली आहे. यात आर्थिक, बांधकाम क्षेत्र, पर्यावरणातील बदल, ग्लोबल,वाॅर्मिंग, आरोग्य, रिसर्च आणि इनोव्हेशन आणि विशेषकरुन भारताचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान,संशोधन व उपचार पद्धती जगासमोर आणण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे…

G20 मध्ये डाॅ.अजित गोपछडे यांना व त्यांच्या टीमला आरोग्य,वैद्यकिय शिक्षण व संशोधन क्षेत्रासंदर्भात महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेपर्यंत जाऊन प्रबोधन, लोकसहभाग आणि जनजागरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारत हा प्राचीन देश असून या देशाची समृध्द अशी संस्कृती आहे. भारताचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान व कौशल्य हे प्राचीन काळापासून सर्वमान्य आहे आणि नुकत्याच आलेल्या कोरोना काळात हे संपूर्ण जगाने अनुभवले आहे.

यावेळी होणाऱ्या G20 संम्मेलनात भारत अध्यक्षपद भूषवित असल्याने S 20 मध्ये भारताच्या आयुर्वेद, योगोपचार,पारंपरिक उपचार पध्दती,पंचगव्य चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा,नाडी परिक्षण,निसर्गाेपचार, होमिओपॅथी आणि इतर आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील संशोधनात्मक विषयावर भारताचे ज्ञान जगात कसे सर्वश्रेष्ठ आहे याची ओळख करून देण्याबाबत खूप मोठी संधी आपणास प्राप्त झाली आहे. सद्यस्थितीत जग हे बऱ्याचश्या अडचणींना सामोरे जात आहे. ज्यात आर्थिक,पर्यावरण असमतोल, आतंकवाद,जैवविवीधतेचा होणारा ऱ्हास व कोविड साथीसारख्या जगाला हादरवून टाकणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण जग दडपणात आहे.

या स्थितीला सांभाळण्यासाठी सर्वाेत्तम उपाय म्हणजे संपूर्ण जगाने एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठीच भारताचे अध्यक्षपद हे “वसुधैव कुटुम्बकम्” या संकल्पनेव्दारे राबविले जात आहे. One earth,one family,one future आणि पर्यावरण पुरक जीवनशैली (life style for environment ) या मुळ विचार प्रणालीवर आधारित one health हे ब्रीद महाराष्ट्रात प्रसारित करण्याचे कार्य G20 मेडीकल विंग मार्फत करण्यात येणार आहे,असे मत डाॅ.अजित गोपछडे यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात बोलतांना डाॅ.अजित गोपछडे पुढे म्हणाले,G 20 सम्मेलनाचे अध्यक्षपद आणि अमृतकाळ असा योग भारताला मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात कार्य करण्यासाठी मिळाला आहे,हे भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे. या अनुषंगानेच ‘G20’ आरोग्य क्षेत्राच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सर्व वैद्यकिय महाविद्यालयेे व विश्वविद्यालये यातील डाॅक्टर्स,पॅरामेडिकल, डेण्टिस्ट,नर्सेस,टेक्निशियन, रेडिओग्राफर – आरोग्यसेवक व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या आरोग्य संशोधन व स्वास्थ्य विषयातील मोहिमेत सहभागी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

याची सुरुवात म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व महाराष्ट्रातील सर्व deemed University या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रबोधन कार्य सुरु करण्यात येणार आहे. जगभरात भारतातील कोव्हिड-19 ची यशस्वीरित्या हाताळणी व सोबतच जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहिम अभूतपूर्वरित्या चालविणे या बाबी पाहिल्या आहेत. आता या अमृतकाळात जगाला भारताच्या इतर विविध वैद्यकिय उपचार प्रणालींचे महत्व पटवून देण्याची योग्य वेळ आणि गरज आहे. G20 संम्मेलनाच्या अनुषंगाने संपुर्ण जगाच्या आरोग्याची जबाबदारीे पेलण्यास भारत समर्थ आहे हे दाखविण्याची ही योग्य वेळ आहे.

आजार व त्यांची कारणे विविध प्रकारची असतात आणि त्यामुळेच त्याच्या उपचारांमध्येसुध्दा विविध उपचार पध्दतीचा समावेश असणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आद्यगुरु धन्वंतरींपासून तर आजतागायत अनेक वर्षांपर्यंत उपचार प्रणाली भारताच्या संस्कृतीत रुजलेल्या आहेत. भारताच्या वैद्यकिय क्षेत्रातील विविधतेचा भाग म्हणून योगाभ्यास,उपचार,मेडिटेशन,कोव्हीडची हाताळणी व संपूर्ण जगाला लस पुरवण्याची कार्यतत्परता जगाने अनुभवलेली आहे. इतिहासाला जवळून बघितल्यास सुश्रुत हे जगातील पहिले सर्जन व चरक हे सर्वात प्राचीन वैद्य भारतात होउन गेले आहे.

इतकेच काय तर अवसादात गेलेल्या अर्जुनाला काउन्सिलिंगच्या माध्यमातून प्रोत्साहित करणारे जगातील पहिले काउंन्सिलर हे भगवान श्रीकृष्ण होते आणि या संभाषणाचा अंतर्भाव असलेल्या भगवद्गीतेला आज संपूर्ण जगात मान्यता आहे. अशीच एक अद्भुत उपचार पध्दती म्हणून आज ज्या गर्भसंस्काराला मान्यता मिळाली त्याची पहिली प्रचिती ही महाभारतात अभिमन्युच्या चक्रव्यूव्हाच्या कथेव्दारे भारतीय संस्कृतीत रुजलेली आहे. आपल्या संस्कृतीतील वेदांमध्ये लिखित स्वरुपातील ग्रंथ अथर्व वेद हे सर्वात प्राचीन आरोग्य ग्रंथ म्हणुन मानले जाते.

आयुर्वेदातील वात,पित्त,कफ यापध्दतीव्दारे व्यक्तिमत्वावर उपचार करणे. याकडे आजही जग कुतुहलाच्या दृष्टीने पहात आहे. केरळ व हिमालयातील आरोग्य केंद्र असो वा इगतपुरीतील जागतिक विपश्यना केंद्र असो किंवा उत्तराखंड ते काश्मिर पर्यंत असलेले योग उपचार केंद्र असो या सगळयांकडे जग आरोग्याच्या पर्यायी पद्धती म्हणून मोठया आशेने पाहत आहे. सोबतच जगातील दुसरी सर्वात जास्त वापरल्या जाणारी आरोग्य पद्धती, होमिओपॅथीची वास्तविक प्रगती ही भारतातच प्रकर्षाने दिसुन येत आहे.

असाध्य आजारांना समूळ नष्ट करण्यासाठी होमिओपॅथीतील प्रगतीशील रिसर्चसुध्दा जगाला दिलासा देणारा आहे. Genetics व Epigenetics या जगातील अतिप्रगत पध्दतीबद्दल भारतातच एडव्हांस्ड हेल्थ मध्ये होत असलेला रिसर्च जगाला आरोग्याचा एक नविन पर्याय देणारा आहे. या सर्व उत्साहवर्धक निकाल देणाऱ्या आरोग्यपध्दतीमुळे भारत आज जगाच्या नकाशावर मेडिकल टुरिझमसाठी प्रसिद्ध होत आहे. अश्या विविध उपचार पध्दतींनी सजलेली भारताची अतिप्राचीन व अतिविकसित वैद्यकिय उपचार पध्दतींचा समागम हा फक्त भारतातच बघावयास मिळतो,हे G20 मार्फत पूर्णसत्य जगासमोर आणल्या जाईल असा विश्वास डाॅ.अजित गोपछडे यांनी व्यक्त केला आहे.

G20 सम्मेलनाचे 200 कार्यक्रम भारताच्या 50 शहरांमध्ये होणार आहेत. यात महाराष्ट्राच्या 4 शहरांमध्ये एकूण 14 कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे यात मुंबई,पुणे,नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर या शहरांमध्ये होणार आहे. मा.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व मा.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनानुसार G20 मेडिकल रिसर्च टिम व्दारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील 100 वैद्यकिय तज्ञांना सहभागी करवून 13 कोटी जनतेपर्यंत जाऊन सुदृढ आरोग्यविषयक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील G20 आरोग्यविषयक व वैद्यकीय क्षेत्रातील विविध कार्यक्रमांची संपूर्ण धुरा डाॅ. अजित गोपछडे यांच्याकडे असेल अशी माहिती नागपूरचे होमियोपॅथी तज्ञ व G20 समिती आरोग्य विज्ञान संशोधन समन्वयक डाॅ.रवि वैरागडे यांनी सांगितले.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डाॅ.अजित गोपछडे,डाॅ.रवि वैरागडे,डाॅ.स्वप्निल मंत्री, डाॅ. भालचंद्र ठाकरे, डाॅ. संगिता अंभोरे, डाॅ. उज्वला दहीफळे, डाॅ. राहुल कुलकर्णी, डॉ. प्रशांत पाटील, डाॅ. अनुप मरार, डाॅ. विंकी रुघवाणी, डाॅ. संजीव चौधरी, डाॅ. बालासाहेब हरपळे, डाॅ. उज्वला हाके, डॉ प्रिती मानमोडे, डॉ. चंचल साबळे, डॉ. कल्पना गोडबोले, डाॅ. मेघना चौगुले, डाॅ. सुनिल चव्हाण, डॉ. रुपाली धर्माधिकारी, डॉ. माधवी गायकवाड, डाॅ. सचिन उमरेकर,डाॅ. गोविंद भताने, डॉ. रश्मी शुक्ला इत्यादी अथक परिश्रम करीत आहेत.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी ‘G20’ अध्यक्ष या नात्याने त्यांच्या संपूर्ण जगाच्या महाकुटुंबाला “वसुधैव कुटुंबकम्” या संकल्पनेव्दारे सर्वांगीण व संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील उपचार पध्दतीची प्रचिती आणून देण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक नागरिकांची आहे,आणि या सर्वांचा सहभाग आरोग्यपूरक व सुदृढ वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!