
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। मुंबई कल्याण येथील इंटरनेशिया इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत असलेले नायगाव येथील सिद्धार्थ भद्रे, प्रथमेश पवार व मुखेड येथील सुखानंद गायकवाड हे सदर कंपनीतर्फे सात दिवसासाठी सहलीवर आज थायलंड या देशाकडे रवाना होणार आहेत.

वृत असे की, माणसाला मोठे करण्यासाठी अथक परिश्रम लागते, प्रचंड मेहनत घेतली की कष्टाचे फळ सहजरीत्या मिळते याची प्रचिती यावरून दिसून येते की, नायगाव शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील सिद्धार्थ अमृता भद्रे, प्रथमेश सुभाषराव पवार यासह मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी या गावातील सुखानंद रामराव गायकवाड यांनी आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी व आपल्याही जीवनात अमूलार्ग बदल घडविण्यासाठी मुंबई कल्याण येथे इंटरनेशिया इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत खाजगी नोकरी स्वीकारून आपले स्वप्न डोळ्यात साठवून प्रचंड मेहनत या तिघांनी सदर कंपनीत घेतली आहे.

काही वर्ष उलटून गेली पण त्यांनी जिद्द सोडली नाही सदर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ, प्रथमेश, सुखानंद यांना मॅनेजर पदावर नियुक्ती केली. तेही त्यांनी सहजरित्या हाताळत असताना अखेर त्यांच्या कार्यप्रणालीवर कंपनीने समाधान मानून सदर कंपनीच्या स्वखर्चाने दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मुंबई ते दिल्ली आणि दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्ली ते थायलंड येथे विमान प्रवासात सिद्धार्थ भद्रे, सुखानंद गायकवाड, प्रथमेश पवार यांनी सात दिवसासाठी सहलीवर थायलंड या प्रगतिशील देशाकडे रवाना होत असल्याने त्यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवार व अप्तजनानी त्यांचे तोंड भरून कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

