
हदगांव,शे. चांदपाशा। तालुक्यातील १३ वाळूघाट निश्चित करण्यात आले आहे. पर्यावरण समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतरच त्यांच्या लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची अशी माहिती आहे.

हदगाव तालुक्यात गौण खनिज उत्खननाच्या घटना नेहमीच उजेडात येतात. वाळूसह .माती, मुरूम, गिट्टी, दगड या गौण खनिजचे अवैध उत्खनन, वाहतूक, विक्री करणारे शहरासह तालुक्यात सक्रिय आहेत. या प्रकरणी महसूल व पोलिस प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई देखील करण्यात येते.

माञ ही कारवाई करत असतांना माञ प्रचंड राजकीय दबावखाली प्रशासनास कारवाई पाडवी लागत असल्याचे महसुल विभागाच्या काही संबंधितांनी आपले नाव न सांगता प्रस्तुत प्रतिनिधीला सागितले कारण यामध्ये गौणखनिज माफीयाना अप्रत्यक्ष राजकीय पाठबळ मिळत असल्याने कारवाई मध्ये भेदभाव होत असल्याची पण चर्चा ऐकवायास मिळत आहे.

अवैध उत्खनन रोखण्यासाठी तालुका खनिकर्म विभागामार्फत बैठे पथक दरम्यान, महसूल व वन विभागाने नवीन वाळू संबंधी सुधारित धोरण जाहीर केले असून, वाळुघाटास पर्यावरण अनुमती देण्यापूर्वी खाणकाम आराखडा (माईनिंग प्लान) तयार करण्याचा निकष लावण्यात आला असल्याची माहीती आहे.

गौण खनिज विभागाने लिलाव योग्य वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार करून वाळू घाटांच्या लिलावाच्या ई-लिलावासाठीची प्रक्रिया केल्याची माहीती असुन त्यासाठी हदगाव तालुक्यात चेंडकापुर, साप्ती, हस्तरा, रुई -धानोरा, बनचिंचोली गोर्लेगाव २ बेळमंडळ. बाभळी, गुरफळी, मनुला (बु)ह्या गावाचे वाळूघाट महसुल विभागाकडून निश्चित करण्यात आले तरी पर्यावरण विषयक समितीची परवानगी माञ अवश्यकच आहे. तरच वाळु घाटाचा लिलाव होणार असल्याचे माहीती सुञांनी दिली

