
नविन नांदेड। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठा चा शिक्षणासाठी विकासासाठी कटिबद्ध असून शाळेतील दुरुस्ती व व शुलभशौचालय सह ईतर भोतीक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही प्राथमिक शिक्षण अधिकारी सौ.सविता बिरगे यांनी जिपके प्राशाळाकौठा येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलतांना दिली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठा येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन २८ जानेवारी रोजी प्राथमिक शिक्षण अधिकारी सौ.सविता बिरगे, जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, नगरसेवक राजू पाटील काळे, नगरसेविका सौ.शांताबाई गोरे यांच्या सह नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचे सचिव रमेश ठाकूर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद काळे, मुख्याध्यापिका सौ. मंगला नवहारे यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.या प्रांरभी छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गणेश वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मानयवराचे स्वागत करण्यात आले.

शिक्षणाधिकारी बिरगे यांनी जिल्हा परिषद शाळा कौठाचा शिक्षणाचा विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून शाळेतील भौतिक सुविधा सह दुरुस्ती, शौचालय यासह इतर मागण्या मान्य करून , नांदेड तालुक्यातील सर्वात मोठी पटसंख्या जास्त असलेली शाळा असुन शहराचा जवळील असलेली एकमेव शाळा असल्याचे सांगून सांस्कृतिक कार्यक्रम मधुन विद्यार्थ्याचा सांस्कृतिक कार्यक्रम मधुन सप्तगुणांना वाव मिळतो असे सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांनी वार्षिक स्नेहसंमेलन साठी नगदी ११०००/ रुपये नगदी दिले तर गटशिक्षणाधिकारी नंदकुमार मुजांजी काकडे यांनी शाळेने दोन हजार रुपये पुस्तके ऊपसिथीत मान्यवरांच्या हस्ते दिली.

शाळेतील १ ते ७ वी मधील विविध विद्यार्थी यांनी गणेश वंदना, देशभक्ती पर, पोवाडा, किर्तन,गवळण,भारूड लोकगिते,बडबड गीते यासह हिंदी, मराठी गितातुन आपली कला,अभिनयाचे सादरिकरणं करून ऊपसिथीत मान्यवरांच्ये,जेष्ठ नागरीक व महिला युवक यांच्या मने जिंकली, कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षीका व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.

