
नांदेड। आर्ट ऑफ लिविंग अर्थात आनंदी जीवनशैलीच्या माध्यमातून जगभर वैचारिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी चिंतन मनन ध्यानधारणेचा सकारत्मक संदेश देणारे श्री श्री रविशंकर जी नांदेड दौऱ्यावर आले असता आमच्या नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार पत्रभूषण @ पंढरीनाथ बोकारे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतला.

यावेळी श्री श्री रविशंकर जी यांनी नानक साई च्या वतीने संत नामदेव घुमान यात्रेच्या माध्यमातून पंजाब आणि महाराष्ट्रातील बंधू प्रेमाचे नाते जोडले जात असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यानिमित्ताने घुमान चळवळीचे प्रनेते पंढरीनाथ बोकारे यांचा श्री श्री रविशंकर जी यांनी सत्कार केला. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, बंडू दायमा, मकरंद जाधव, धनंजय उमरिकर हे उपस्थित होते.

नानक साई फाऊंडेशन सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेली अग्रेसर संस्था असून संत नामदेव घुमान यात्रेच्या माध्यमातून पंजाब आणि महाराष्ट्रात या चळवळीच मोठं नेटवर्क उभे राहिले आहे. दोन राज्यात बंधू प्रेमासह सांस्कृतिक देवाण घेवाण करण्यात हि चळवळ यशस्वी ठरली आहे. या कार्याची दखल घेऊन श्री श्री रविशंकर यांनी नांदेड दौऱ्यात घुमान चळवळी चे प्रणेते पंढरीनाथ बोकारे यांचा सत्कार केला.

