
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। संबंध जिल्हाभरात प्रसिद्ध असलेल्या रातोळी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री. रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवात सात दिवशीय किर्तन सप्ताह सोहळा, नयनरम्य आतिषबाजी, पालखी, गणगवळण, भारुड , जंगी कुस्त्यांचा फड यासह लोककला व लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या रातोळी येथील रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन यंदा दि. ३० जाने. ते दि. ७ फेबुवारी या काळात ही यात्रा संपन्न होत आहे. या काळात विविध नामवंत किर्तनकाराची मेजवानी तसेच दि.5 फेबु्वारी रोजी पालखी मिरवणुक, नयनरम्य आतिषबाजी व दि.6 फेब्रुवारी रोजी काल्यांचे किर्तन व जंगी कुसत्यांचा फड इत्यादी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.

या यात्रा महोत्स्वातून परिसरातील नागरिकांना सामाजिक व सांस्कृतिक कार्यकमांची मेजवानी रातोळीकर यांच्या अथांग प्रयत्न व सेवा सहकार्याने मिळत असते. या यात्रेत भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटी रातोळी व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

दि. 7 फेब्रुवारी रोजी लोककला व लावणी महोत्सव
महाराष्ट्राची लोककला व लावणी या कला आविस्कारातुन नवोदीत कलाकारांना एक व्यासपीठ तयार करून देण्याचा आगळावेगळा उपक्रम रातोळीकर गेल्या अनेक वर्षापासून निरंतरपणे जोपासित आहेत. लोककला व लावणी महोत्सव रातोळी यात्रेच मुख्य आकर्षण आहे. दि. 7 फेबुवारी रोजी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत लोककला व लावणी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टी. जी. पाटील रातोळीकर यांनी दिली.

