
हदगाव /तामसा, गजानन जिदेवार। तामसा येथील श्री गोपाल कृष्ण मंदिरात पंचपर्व सोहळ्याला 2 फेब्रुवारी रोजी गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला असून दोन दिवस तामसेकराना विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. विविध पुजनाबरोबरच आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे हस्ते कार्यक्रमाच्या मंगलपिठाचे श्रीफळ फोडून उद्घाटन संपन्न झाले.

तामसा येथील महानुभाव पंथाचे श्रीगोपाळकृष्ण मंदिराचे उद्घाटन, कलश चण्डीगढ़रोहन, श्रीकृष्ण मूर्ती स्थापना, ईश्वरानुसारं सोहळा, श्रीकृष्ण महापूजा पंचावतार उपाहार, ईश्वरानुसरण सोहळा व श्रीकृष्ण महापूजा पंचावतार उपहार पर्व असा पाच पर्वाच्या सोहळ्याला 2फेब्रुवारी रोजी गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. या सोहळ्याला विविध राज्यातून जनसागर उसळणार आहे. श्रीकृष्ण मंदिराचे महंत प.पु. श्री. भोजराजदादा अमृते यांच्या नियोजनातून उभारण्यात आलेल्या आचार्य अमृते मायंबानगरीत प्रस्तुत धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी सुरू झाली आहे.

गुरुवारी दुपारी श्रीकृष्ण मूर्तीची तामसा शहरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. यात लेझीम, बँड बाजा, ढोल ताशे, विविध गुणदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले आहे. पारंपारिक नृत्य, टिपरी, दांडिया, मंगल कलश, भजन, अनेक भागातील संत, महंत घोड्यावर स्वार होऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते. एकंदर शोभायात्रेने तामसा शहरात भक्तीचे वातावरण पसरले होते. यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सहभाग व सेवेचा लाभ घेतला होता.

