
हिमायतनगर। तालुक्यातील आदर्श गाव टेंभी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगाना साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. टेंभी येथील ग्राम पंचायतच्या सरपंच पदी निवड झाल्यापासून सरपंच सौ. वंदनाताई कानबाराव पोपलवार ह्या ग्राम पंचायत कार्यालयात नेहमीच सामाजिक उपक्रम राबवितात.

अपंगाचा हा महत्त्वपूर्ण विषय अंमलात आणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर कुमार अंदेलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि०१ बुधवारी ग्राम पंचायत कार्यालयात गावातील अपंग व्यक्तींना बोलावून त्यांना आवश्यकतेनुसार साहीत्य वाटप केले आहे. या प्रसंगी सरपंच सौ. वंदनाताई पोपलवार म्हणाल्या की, तालूक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निधी खेचून आणून गावाचा सर्वागीण विकास साधनार आहे.

गावात मुलभूत सोयी, सुविधांवर भर देत दर्जेदार शिक्षण, आरोग्य, पाणी, विज या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून गावकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही. असे सांगताना सौ. पोपलवार म्हणाल्या की, अपंग व्यक्तीची गरज अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यांना आमच्या हातून साहित्याच्या माध्यमातून मिळवून दिलेली मदत खऱ्या अर्थाने आपलाला आनंद देणारी आहे. असे सरपंच सौ. पोपलवार म्हणाल्या. यावेळी उपसरपंच प्रतिनीधी आनंद मुतनेपवाड, कानबाराव पोपलवार, शेषेराव पाटील, अशोक पाटील यांच्यासह अपंग व्यक्तीची प्रामूख्याने उपस्थिती होती.

