
वडवणी। डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष डोंगरचा राजाचे संपादक अनिल वाघमारे यांना नुकताच मुकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, बीड जिल्ह्यासह माजलगाव विधानसभा मतदार संघातील वडवणी, धारुर तालुक्यात सर्व परिचित असलेले डोंगरचा राजा वृत्तपत्राचे संपादक तथा डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांना नुकताच माजलगाव येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा मुकनायक पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आला आहे. संपादक अनिल वाघमारे यांना मुकनायक हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

