
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। नायगांव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे श्री क्षेत्र खंडोबा मंदिर येथे अखंड हरीनाम सप्ताह व महाप्रसादाचे आयोजन समस्त घुंगराळा वासीयांच्या वतीने करण्यात आले असून सदरील कार्यक्रमाचा व कीर्तनाचा लाभ घुंगराळा परिसरासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावे असे आवाहन गावक-याच्या वतीने केले आहे.

दि. ५ रोजी अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रारंभ च्या निमित्ताने गावातून भव्य मिरवणूक व शोभा यात्रा सकाळी ११ वाजून ३० मिनिटानी गावातील मुख्य रस्त्यानी गावकऱ्याच्या वतीने काढण्यात येणार आहे. सप्ताह मध्ये नित्य कार्यक्रम पाहाटे ४ ते ६ काकडा आरती स.८ ते ९ मल्हारी शप्तशदी पाठ व वाचन स.१० ते ११ पारायण दुपारी १ ते २ गाथा व भजन संध्याकाळी ५ ते साडे सहा हरीपाठ रात्री साडे आठ ते ११ कीर्तन कार्यक्रम होणार आहेत.

दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री ह. भ. प. भागवताचार्य मधुसूदन महाराज कापसीकर ,दिनांक ६ रोजी श्री हं भ प रामायणाचार्य बालाजी महाराज गुडेवार, दिनांक ७ रोजी श्री हं भ प कृष्णा महाराज राजुरकर, दिनांक ८ रोजी श्री हं भ प भागवताचार्य रुपालीताई सवणेकर, दिनांक ९ रोजी श्री हं भ प चंद्रकांत महाराज लाठकर, दिनांक १० रोजी घुंगराळा येथे श्री हं भ प भागवताचार्य साध्वी महंत मुक्ताई नाथ माऊली उदगीर, दिनांक ११ रोजी श्री हं भ प. बाबू महाराज काकांडीकर ,दिनांक १२ रोजी श्री हं भ प. विशाल महाराज खोले जळगावकर व दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री हं भ प. विशाल महाराज खोले यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ९ ते ११ पर्यंत होणार आहे.

दररोज खंडोबा देवाचा जागरणाचा आणि वाघ्याचा कार्यक्रम नरसी घुंगराळा कुंटूर बरबडा अंचोली सोमठाणा शंकर नगर धूप्पा यांचा राहणार असल्यामुळे सदर कार्यक्रमाला भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

